May 20, 2024

राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेस आजपासून प्रारंभ

पुणे – ८ सप्टेंबर २०२३ – राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय रग्बी कार्यशाळेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय रग्बी संघटना म्हणजेच रग्बी इंडिया आणि भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटना,  तसेच मित्सुबिशी महामंडळाच्या वतीने ही स्पर्धा आणि कार्यशाळा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ९ ते ११  सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे.
व्हिलचेअर राष्ट्रीय रग्बी स्पर्धेच्या माध्यमातून भारतातील व्हिलचेअर रग्बी क्षेत्र एक मैल गाठणार आहे. व्हिलचेअरच्या राष्ट्रीय स्पर्धेत आजपर्यंत मिळाला नाही तेवढा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असून, एकूण १५ राज्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यामध्ये बिहार चंडिगड , छत्तीसगड, हरियाना, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगला, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
या स्पर्धेबरोबरच येथेच व्हिलचेअर रग्बी संदर्भात जपान इंडिया स्क्रम प्रोजेक्ट या अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जपान व्हिलचेअर रग्बी महासंघ आणि मित्सुबिशी महामंडळाच्या वतीने एकदिवसीय व्हिलचेअर रग्बी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जपान आणि भारत यांच्या झालेल्या परस्पर सामंजस्य करारानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जपानमधील प्रशिक्षक आणि तज्ज्ञ उपस्थितांनी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ताकेशी शोजी, ताकायुकी नोरिमात्सु, नोरिको निकाईडो आणि युकी इझुची हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. मित्सुबिशीचे भारतातील मुख्य प्रादेशिक अधिकारी हाजिमो किटो हे देखिल उपस्थित राहणार आहेत.
रग्बी इंडियाचे सचिव गेराल्ड प्रभु म्हणाले, भारतातील रग्बी खेळाचा विकास व प्रगती करणे हे आमच्याच संस्थेच्या कार्याचा एक भाग आहे. तसेच, एक प्रशासकीय संस्था म्हणून आमच्यासाठी व्हिलचेअर रग्बी हे वेगळे आव्हान होते. व्हिलचेअर रग्बीचा प्रसार करण्यासाठी सर्व प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही मित्सुबिशी महामंडळ, महाराष्ट्र राज्य रग्बी संघटना आणि सरकारचे अत्यंत आभारी आहोत. या निमित्ताने काही रोमांचक रग्बी खेळ पाहण्यासाठी आपण सज्ज असू. सर्व सहभागी संघांना माझ्या शुभेच्छा.!
या वेळी उपस्थित भारतीय व्हिलचेअर  महासंघाचे अध्यक्ष निखिल कुमार गुप्ता म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांपासून व्हिलचेअर रग्बीला चांगला पाठिंबा मिळत आहे. यासाठी रग्बी इंडिया आणि पॅरालिम्पिक समितीचे मोठे सहकार्य लाभले. ही स्पर्धा व्हिलचेअर रग्बी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता दाखवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देईल. आमचे खेळाडू नेहमीच आव्हानाचा सामना करून विजयी कामगिरी दाखविण्यासाठी सज्ज असतात.’