May 8, 2024

आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत विवान खन्ना, विनय शिंदे यांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, 9 सप्टेंबर 2023:  पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलांच्या गटात विवान खन्ना, विनय शिंदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
एनआयबीएम रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी आणि इव्हॉल्व्ह स्क्वॅश कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 13 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत पुण्याच्या विवान खन्नाने औंगाबादच्या साईराज भुतेकरचा 11-00, 11-04 असा तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत उस्मानाबादच्या विनय शिंदेने परभणीच्या तेजस ताटेचा 11-02, 11-05 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
11वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य पुर्व फेरीत पुण्याच्या विवान रॉयने विहान जाधवचा 11-02, 11-00 असा सहज पराभव केला. औरंगाबादच्या पार्थ गाडेकरने  आपली शहर सहकारी रिधान गाडेकरचा 11-06, 11-04 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत नाशिकच्या रुद्राक्ष सोनवणे, अमरावतीच्या अंशुमन सोनोने, उस्मानाबादच्या सिद्धांत चौधरी, औरंगाबादच्या हर्षवर्धन रजाळे यांनी आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
पार्थ गाडेकर(औरंगाबाद) वि.वि.रिधान गाडेकर (औरंगाबाद)11-06, 11-04;
विवान रॉय (पुणे)वि.वि.विहान जाधव (पुणे) 11-02, 11-00;
विराज जाधव (पुणे)वि.वि.रणवीर खेडकर (जळगाव) 11-04, 11-00;
ध्रुव दुबे (पुणे)वि.वि.श्रीहान सिंघे 11-04, 11-02;
13 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
विवान खन्ना (पुणे)वि.वि.साईराज भुतेकर (औरंगाबाद) 11-00, 11-04;
विनय शिंदे (उस्मानाबाद)वि.वि.तेजस ताटे (परभणी) 11-02, 11-05;
15 वर्षांखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
रुद्राक्ष सोनवणे (नाशिक)वि.वि.हिमांशू गायकवाड (औरंगाबाद) 11-08, 11-03;
अंशुमन सोनोने (अमरावती)वि.वि.दक्षित महाजन (जळगाव) 11-03, 11-09;
सिद्धांत चौधरी (उस्मानाबाद)वि.वि.अथर्व वाघमोडे (औरंगाबाद) 06-11, 11-06, 11-01;
हर्षवर्धन रजाळे (औरंगाबाद)वि.वि.श्रेयस नाईकवाडे (परभणी) 11-06, 11-04;
15 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
अनिका दुबे (पुणे)वि.वि.संस्कृती गव्हार (उस्मानाबाद) 11-03, 11-06;
आर्या देशपांडे (जळगाव)वि.वि.सोमिक्षा मोरे (नाशिक) 11-04, 11-05;
अनुष्का वाणी (जळगाव)वि.वि.पल्लवी मांडे 11-03, 11-07;
 कुहू पारेख (पुणे)वि.वि.शौर्य धुमाळ (उस्मानाबाद) 11-05, 11-04;