May 3, 2024

एस समर गेम्स २०२४ स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये शिवानी मसलेकर, सिद्धी जगदाळे, शर्वरी सुरवसे, अथर्व काळे, वत्सल तिवारी यांची आगेकूच

पुणे, ११ एप्रिल २०२४: ईगल आय सोल्युशन्स आणि टू एल्व्हस क्राफ्टेड सोल्युशन्स यांच्या वतीने आयोजित एस समर गेम्स बॅडमिंटन स्पर्धेत १५ वर्षाखालील गटात शिवानी मसलेकर, सिद्धी जगदाळे, शर्वरी सुरवसे, अथर्व काळे, वत्सल तिवारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

मुंढवा येथील चंचला कोद्रे स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत दुसऱ्या मानांकित शिवानी मसलेकरने द्विती शहाचा ११-१५, १५-१२, १५-८ असा संघर्षपूर्ण पराभव केला. सिद्धी जगदाळेने अक्षरा सत्तीकरचा १५-७, १५-१० असा तर, समन्वया धनंजय हिने अन्वेषा नाईकचा १५-९ १५-२ असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित शर्वरी सुरवसेने निनोष्का देवडीकरवर १५-६ १५-५ असा सहज विजय मिळवला.

१५ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित सिबतैनराझा सोमजीने नयन भामरेचे आव्हान १५-९ १५-६ असे संपुष्टात आणले. वत्सल तिवारी याने दिव्यान कौशिकचा १५-१०, १०-१५, १५-१० असा तीन सेटमध्ये पराभव केला. अथर्व काळेने अतिक्ष अग्रवालला १५-५, १५-८ असे पराभूतकेले. अयांश यारागट्टीने रितेश सावरालाचा १५-९ १५-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत रेहान सय्यदने शौर्य नाईकचा १५-१०, १२-१५, १५-१० असा पराभव केला.

१३ वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत निधी गौकवाड, स्वरा मोरये, मुद्रा मोहिते, स्वराली थोरवे, आदिती उपलेंचवार, समन्वया धनंजय, निनोष्का देवडीकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

निकाल: दुसरी फेरी: ११ वर्षाखालील मुले:
कबीर तांबे वि.वि.सिद्धराज पवार १५-६ १५-७;
अर्चित खान्देशे वि.वि.कबीर महेश्वर १५-४ १५-२;
आर्यवीर गिल वि.वि.अथर्व जगदाळे १५-१३ १६-१४;

१३ वर्षांखालील मुली: दुसरी फेरी:
निधी गौकवाड वि.वि.शान्वी सिनगारे १५-८ १५-४;
स्वरा मोरये वि.वि.खुशी दासवानी १५-१ १५-१;
मुद्रा मोहिते वि.वि.चारवी लपसिया १५-५ १५-७;
स्वराली थोरवे वि.वि.शुभदा जाधव १५-१३, ०८-१५, १६-१४;
आदिती उपलेंचवार वि.वि.शुभांगी मुलचंदानी १५-११ १५-६;
समन्वया धनंजय[२]वि.वि.आदित्री चौधरी १५-७ १५-१;
निनोष्का देवडीकर वि.वि.वेदिका श्रीवास्तव १५-१२ १५-१२;

१५ वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
सिबतैनराझा सोमजी[१]वि.वि.नयन भामरे १५-९ १५-६;
अयांश यारागट्टी वि.वि.रितेश सावराला १५-९ १५-१;
रेहान सय्यद वि.वि.शौर्य नाईक १५-१०, १२-१५, १५-१०;
वत्सल तिवारी वि.वि.दिव्यान कौशिक १५-१०, १०-१५, १५-१०;
अवनीश बांगर वि.वि.एकलव्य श्रीवास्तव १५-५ १५-९;
अथर्व काळे वि.वि.अतिक्ष अग्रवाल १५-५, १५-८; ;
कार्तिक दिनेश वि.वि.पृथ्वीराज जाधव १५-११, १५-८;

१५ वर्षांखालील मुली:
अरुंधती कोंवर वि.वि.ओवी नातू १५-३ १५-६ ;
शिवानी मसलेकर[२] वि.वि.द्विती शहा ११-१५, १५-१२, १५-८;
सिद्धी जगदाळे वि.वि.अक्षरा सत्तीकर १५-७, १५-१०;
समन्वया धनंजय वि.वि.अन्वेषा नाईक १५-९ १५-२;
स्वराली थोरवे वि.वि.जीविका कासवा १५-११, १५-१०;
शुभदा जाधव वि.वि.इरा कपिला १५-८ १५-६;
शर्वरी सुरवसे[१] वि.वि.निनोष्का देवडीकर १५-६ १५-५;
वेदिका श्रीवास्तव वि.वि.शताक्षी देशपांडे १५-९ १५-१३;