May 2, 2024

पुणे: व्यापार्‍यावर गोळ्या झाडणार्‍या हल्लेखोरांना अटक; २ पिस्तूल, ३१ काडतुसे जप्त, युनीट दोनची कामगिरी

पुणे, दि. २४/०७/२०२३: लुटमारीच्या उद्देशाने तंबाखू विक्री करणार्‍या व्यापार्‍यावर स्वारगेट परिसरात गोळीबार करुन रक्कम लुटणार्‍या तिघांना युनीट दोनने बंगलोरमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तूल, ३१ काडतुसे असा शस्त्रसाठा आणि ३ लाख ५२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अभयकुमार सुबोदकुमार सिंग (वय २३ रा. मार्कटयार्ड, मुळ,रा. रामदिरी गाव, बुगुसरा, मटिहाणी ठाणा, बिहार) नितीश कुमार रमाकांत सिंग (वय २२) मोहमद बिलाल शेख (वय-२८,रा.आंबेडकरनगर मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंडई परिसरातील तंबाखू व्यापारी रोकड घेउन दुचाकीवर घरी चालले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून रोकड हिसकावून नेली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट दोनकडून समांतर तपास करण्यात येत होता. पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे, उपनिरीक्षक राजेद्र पाटोळे आणि अमलदार अशा तीन पथकांकडून तपास केला जात होता. गुन्हयातील मुख्य फरार आरोपी बॅगलोरमध्ये असल्याची माहिती युनीट दोनला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उत्तम तारु, उज्वल मोकाशी, अमोल सरडे, गजानन सोनुने बेंगलोरमध्ये गेले.

आरोपी अभयकुमार, नितीश, मोहमदला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेले पिस्तूल, रोकड जप्त करण्यात आली. आरोपींकडून ०२ पिस्तूल, ३१ जिवंत काडतुसे साडेतीन लाखांची रोकड असा ४ लाख २० हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, एपीआय वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, उत्तम तारु, राहुल राजपुरे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, गणेश थोरात, अमोल सरडे, प्रमोद कोकणे, गजानन सोनुने, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांनी केली.