पुणे, दि. २७/०७/२०२३: कबुतर पकडल्यामुळे अल्पवयीन मुलाला कबुतराची विष्टा खायला लावल्याची घटना कात्रज परिसरात घडली आहे. त्यानंतर संबंधिताला टोळक्याने जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले.याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह अमोल आडम (सर्व रा. कात्रज) यांच्या विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रजमधील १२ वर्षाच्या मुलाने सच्चाई मातानगर परिसरातून कबुतर पकडून आणले होते. त्याचा राग मनात धरुन आरोपींनी त्याला मारहाण करत दुचाकीवर बसवले. लोखंडी हत्यार फिरवत त्यांनी दहशत पसरवली, कोणी मधे आले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलाला कात्रज येथील साई अपार्टमेंट इमारतीवर घेऊन गेले. तेथे गेल्यावर मुलाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. एका आरोपीने कबुतराची विष्टा आणून इतरांनी त्याला विष्टा खाण्यास भाग पाडले. परत आमच्याकडे कबुतर न्यायला आला तर जीवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करत आहेत.
More Stories
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस चांगला प्रतिसाद