May 9, 2024

पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक संघांची विजयी सलामी

पुणे – 10 सप्टेंबर 2023 – भारतीय रग्बी संघटना(रग्बी इंडिया), भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटना आणि मित्सुबिशी महामंडळाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत साखळी फेरीत महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अ गटात सोमनाथ जाधव 7, अॅग्नेल फ्रान्सिस 6, सुरेंदर कासारे 4, अँथनी जॉन 3 यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा 20-7 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. ब गटात बिहार संघाने चंदीगड संघाचा 21-6 असा पराभव विजयी सुरुवात केली. विजयी संघाकडून राजीव कुमार 11, धीरज सिंग 2, शैलेश कुमार 6, दीपक शर्मा 2 यांनी अफलातून कामगिरी केली.
अन्य लढतीत कर्नाटक संघाने केरळ संघाचा 14-10 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: 
गट ड: राजस्थान: 27 (सचिन वर्मा 8, विमल योगी 7, रतन कुमार 7, रामेश्वर जाजरा 5) वि.वि.तामिळनाडू: 4 (मुरुगन सेल्लादुरी 2, गोपाल रघुपती 1, गोपी नेस्मानी 1)
गट अ: कर्नाटक: 14(मंजुनाथ 6, श्रीकांत देसाई 4, महांतेश हंगल 2, नंदिश बीएन 2) वि.वि.केरळ: 10 (एबिन जोसेफ 5, अखिल आर 3, रथीश सादिक 3)
गट ब: बिहार: 21 (राजीव कुमार 11, धीरज सिंग 2, शैलेश कुमार 6, दीपक शर्मा 2) वि.वि.चंदीगड: 6 (विक्रम सिंग 2, सुनील 3, निशा गुप्ता 1);
गट अ: महाराष्ट्र: 20(सोमनाथ जाधव 7, अॅग्नेल फ्रान्सिस 6, सुरेंदर कासारे 4, अँथनी जॉन 3) वि.वि.केरळ: 7(एबिन जोसेफ 3, अखिल रेजी 2, रथेश सादिक 2)