May 8, 2024

आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत ध्रुव दुबे, ईशा शेळके, विवान खन्ना, वसुंधरा नागरे, इद्रसिंग बडगुजर, अनिका दुबे, रुद्रसिंग बडगुजर, हावरा भानपुरवाला यांना विजेतेपद

पुणे, 10 सप्टेंबर 2023: पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत ध्रुव दुबे, ईशा शेळके, विवान खन्ना, वसुंधरा नागरे, इद्रसिंग बडगुजर, अनिका दुबे, रुद्रसिंग बडगुजर, हावरा भानपुरवाला यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
एनआयबीएम रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी आणि इव्हॉल्व्ह स्क्वॅश कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत पुण्याच्या ध्रुव दुबेने औरंगाबाद च्या पार्थ गाडेकरचा 11-03,11-03 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत औरंगाबादच्या ईशा शेळकेने ईशा आंबेकरचा 11-06, 11-04 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
13 वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या विवान खन्नाने उस्मानाबादच्या विनय शिंदेचा 11-04, 11-08 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मुलींच्या गटात अंतिम फेरीत उस्मानाबादच्या वसुंधरा नागरे हिने पुण्याच्या दृष्टी खत्रीचा 11-04, 11-04 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अमरावतीच्या इंद्रसिंग बडगुजर याने उस्मानाबाद च्या सिद्धांत चौधरीचा 11-08, 11-06 असा पराभव विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुण्याच्या अनिका दुबेने आपली शहर सहकारी कुहू पारेखचा 11-01, 11-00 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात अमरावतीच्या रुद्रसिंग बडगुजर याने परभणीच्या प्रतीक टाकचा 11-07, 11-06 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत पुण्याच्या हावरा भानपुरवाला हिने सांगलीच्या श्रुती मगदूमचा 11-01, 11-02 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनच्या रिटेल सेल्स विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मयंक गुप्ता, राज्याचे क्रिडा उपसंचालक अनिल चोरमले, एसआरएफआयचे सदस्य चेतन अमीन, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सह सचिव डॉ. दयानंद कुमार, महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांडरे, पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव ऍड. आनंद लाहोटी, नकुल चव्हाण आणि सागर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेंद्र कारवा, सतीश पोतदार, डॉ. राकेश बडगुजर, ऋषीकेश बजाज, दत्तात्रय ठनगे, पवन राउत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:11 वर्षांखालील मुले:उपांत्य फेरी:
पार्थ गाडेकर (औरंगाबाद)वि.वि.विवान रॉय (पुणे) 11-09, 09-11, 12-10;
 ध्रुव दुबे (पुणे)वि.वि.विराज जाधव (पुणे) 11-01, 11-03;
अंतिम फेरी: ध्रुव दुबे (पुणे)वि.वि.पार्थ गाडेकर (औरंगाबाद) 11-03,11-03;
11 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी: ईशा शेळके (औरंगाबाद)वि.वि.ईशा आंबेकर (औरंगाबाद) 11-06, 11-04;
13 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी: विवान खन्ना (पुणे) वि.वि.विनय शिंदे (उस्मानाबाद) 11-04, 11-08;
 13 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी:वसुंधरा नागरे (उस्मानाबाद)वि.वि.दृष्टी खत्री(पुणे) 11-04, 11-04;
15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
सिद्धांत चौधरी (उस्मानाबाद)वि.वि.अंशुमन सोनोने (अमरावती) 11-08, 11-08;
इंद्रसिंग बडगुजर (अमरावती)वि.वि.हर्षवर्धन रजाळे (औरंगाबाद) 11-04, 11-06;
अंतिम फेरी: इंद्रसिंग बडगुजर (अमरावती)वि.वि.सिद्धांत चौधरी (उस्मानाबाद) 11-08, 11-06;
15 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
अनिका दुबे (पुणे)वि.वि.आर्या देशपांडे (जळगाव) 11-01, 11-01;
कुहू पारेख (पुणे)वि.वि.अनुष्का वाणी (जळगाव)
अंतिम फेरी: अनिका दुबे (पुणे)वि.वि.कुहू पारेख (पुणे) 11-01, 11-00;
17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
 रुद्रसिंग बडगुजर (अमरावती)वि.वि.खुश फालक (जळगाव) 11-00, 11-01;
 प्रतीक टाक (परभणी)वि.वि.स्वयं शाह (सांगली) 11-02, 11-02;
अंतिम फेरी: रुद्रसिंग बडगुजर (अमरावती)वि.वि.प्रतीक टाक (परभणी) 11-07, 11-06.
17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
श्रुती मगदूम (सांगली)वि.वि.मैत्री अहिरे (नाहिक) 11-09, 11-05;
हावरा भानपुरवाला (पुणे)वि.वि.वसुंधरा बजाज (पुणे) 11-01, 11-03;
अंतिम फेरी: हावरा भानपुरवाला (पुणे)वि.वि.श्रुती मगदूम (सांगली) 11-01, 11-02.