October 5, 2024

डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन

पुणे, 2 ऑक्टोबर 2024: आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा पुरस्कार करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या डेकॅथलॉनच्या वतीने येत्या २७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात पहिल्यांदाच १० कि.मी. धावण्याच्या शर्यतीचे आयोजन केले आहे. पुण्यातील अॅग्रिकल्चर कॉलेज येथे ही शर्यत पार पडणार आहे. ही मॅरेथॉन महाराष्ट्र एथलेटिक संघटनेच्या मान्यतेखाली होत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना डेकॅथलॉन पुणे शहर प्रमुख मेहरब भाया, डेकॅथलॉन प्लेचे वेस्ट झोन लीडर आदित्य शिंदे, डेकॅथलॉन पुणेचे स्टोअर प्रमुख अजिंक्य निंबाळकर, ब्लू ब्रिगेड स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक अजय देसाई आणि डेकॅथलॉन पुणेचे क्रिडा प्रमुख शुभम गुळवे यांनी सांगितले की, डेकॅथलॉनच्या १० कि.मी. शर्यतींना भारतातील विविध शहरांमध्ये अत्यंत भरघोस प्रतिसाद लाभला असून प्रतिवर्षी सर्व वयोगटातील आणि विविध जीवनशैलीतील १,००,००० हून अधिक धावपटूंनी त्यात सहभाग घेतला आहे.

यंदाच्या वर्षी डेकॅथलॉनने हा इव्हेन्ट पहिल्यांदाच पुण्यात आयोजित केला असून धावण्यावर आणि व्यायाम व तंदुरुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व वयोगटातील नागरिकांना सहकुटुंब सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अगदी नवोदितांनाही या शर्यतीत सहभागी होता येणार आहे. पुणे शङरातील मध्यवर्ती ठिकाणी पार पडणाऱ्या या इव्हेन्टच्या माध्यमातून तंदुरुस्तीप्रेमी नागरिकांचा एक सामायिक समुदायच तयार होणार आहे. क्रीडासाहित्याचे अग्रगण्य उत्पादक असलेल्या डेकॅथलॉन यांनी क्रीडाक्षेत्र हे प्रत्येक नागरिकासाठी आनंददायक आणि मनोरंजक बनविण्याचा संकल्प सोडला आहे. ‘क्रीडाक्षेत्रातील रंगतदार व रोमांचकारी घटकांचा अनुभव नागरिकांना करून देऊन त्यांना एका बंधुभावाने एकत्र आणणे’ हे लक्ष्य डेकॅथलॉनने ठेवले आहे.

त्याकरिता क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून तंदुरुस्ती प्राप्त करून त्यायोगे आपल्या व्यक्तिमत्वात होणारा अद्भुत अनुभव अनुभवण्याची संधी डेकॅथलॉनने सर्व स्तरांतील, सर्व वयोगटातील युवा, ज्येष्ठ व नवोदित नागरिकांना, स्त्री-पुरुषांना मिळवून देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळेच या १० कि.मी. शर्यतीच्या आयोजनासाठी डेकॅथलॉनने २०० शर्यतींचा आणि त्यामधील दोन लाख धावपटूंच्या सहभागाचा अनुभव असलेल्या ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स क्लबचे सहकार्य घेतले आहे.

‘धावण्याच्या माध्यमातून मधुमेहाचे व्यवस्थापन’ या क्षेत्रातील ब्लू ब्रिगेडच्या भावनात्मक सहभागामुळे आणि आणखी एका आगळ्यावेगळ्या लक्ष्याच्या माध्यमामुळे या शर्यतीला आणखी एक अनोखा पैलू प्राप्त झाला आहे. डेकॅथलॉन आणि ब्लू ब्रिगेड हे दोघे मिळून अनुभवींपासून नवोदितांपर्यंत सर्व धावपटूंसाठी पुण्यातील १० कि. मी. शर्यत हा अविस्मरणीय अनुभव ठरावा, याकरिता प्रयत्न करीत आहेत.

इतकेच नव्हे तर या शर्यतीच्या माध्यमातून नियमित व्यायाम आणि तंदुरुस्तीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे लक्ष्य डेकॅथलॉनने ठेवले आहे. म्हणूनच तुम्हाला याआधी कोणत्याही शर्यतीत सहभागी होण्याचा अनुभव असो किंवा नसो, तुमची तंदुरुस्ती पातळी कोणतीही असो, या शर्यतीत सहभागी होऊन एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जाण्याचे आवाहन डेकॅथलॉनने सर्व वयोगटातील नागरिकांना केले आहे. तसेच या माध्यमातून आरोग्यपूर्ण आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा प्रारंभ करण्याचे आवाहनही डेकॅथलॉनने केले आहे.

तुम्ही कोणत्याही वयोगटातील असलात, तरी या शर्यतीत सहभागी होण्याची संधी दवडू नका. नाव नोंदणीला प्रारंभ झाला असून लवकर नोंदणी करणाऱ्यांना सवलतही मिळणार आहे.

डेकॅथलॉनच्या १० कि.मी. शर्यतीकरिता नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. डेकॅथलॉन : 7391055670 ब्लू ब्रिगेड : 9766353337 email: letsplaypune@decathlon.com / https://play.decathlon.in/ साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.