October 3, 2024

दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात

पुणे, दि.27 सप्टेंबर 2024- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सुरुवात केली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इम्पेरियल स्वान्स संघाने ईगल्स संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. इम्पेरियल स्वान्स संघाकडून तेजस किंजवडेकर, विक्रांत पाटील, नेहा लागु, गोपिका किंजवडेकर, सचिन काळे, विश्वास मोकाशी, कर्णा मेहता, कपिल बाफना यांनी सुरेख कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात सारंग आठवले, सुधांशु मेडसीकर, अभिजित राजवाडे, विनित रुकारी, जितेंद्र केळकर, प्रशांत वैद्य, तन्मय चितळे, सोहम कांगो, चैतन्य वाळिंबे, रियान करंदीकर यांनी विजयी कामगिरीच्या जोरावर ऑप्टिमा फाल्कन्स संघाने काराज कार्डिनल्स संघाचा 5-2 असा सहज विजय मिळवला.

अन्य लढतीत साइनुमेरो जालन गोशॉक संघाने फिनिक्स संघाचा 4-3 असा पराभव केला. विजयी संघाकडून अनिकेत सहस्रबुद्धे, सिद्धांत खिंवसरा, प्रीती फडके, राजश्री भावे, गिरीश खिंवसरा, समीर सावला, तुषार मेंगळे, समीर जालन यांनी अफलातून कामगिरी केली.

निकाल: साखळी फेरी:
इम्पेरियल स्वान्स वि.वि.ईगल्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी 1: तेजस किंजवडेकर/विक्रांत पाटील वि.वि.अमित देवधर/रणजित पांडे 21-15, 21-18; गोल्ड खुला दुहेरी 2: आदित्य काळे/आदित्य गांधी पराभुत वि.देवेंद्र चितळे/यश काळे 21-16, 16-21, 10-15; खुला दुहेरी 3: नीरज दांडेकर/पार्थ केळकर पराभुत वि.अक्षय ओक/रोहित भालेराव 15-21, 21-19, 11-15; महिला दुहेरी 4: नेहा लागु/गोपिका किंजवडेकर वि.वि.दिया मुथा/दिप्ती वाळिंबे 21-16, 21-13; वाईजमन दुहेरी 5: सचिन काळे/विश्वास मोकाशी वि.वि.अतुल ठोंबरे/अनिल देडगे 11-21, 21-20, 15-13; खुला दुहेरी 6: कर्णा मेहता/कपिल बाफना वि.वि.निखिल कानिटकर/मनीष शहा 15-13, 15-11; खुला दुहेरी 7: विक्रम ओगले/आनंद घाटे पराभुत वि.विनित राठी/वरद चितळे 08-15, 08-15);

साइनुमेरो जालन गोशॉक वि.वि.फिनिक्स 4-3((गोल्ड खुला दुहेरी 1: सुजीत कुलकर्णी/अनिरुद्ध कोनकर पराभुत वि.अनिश राणे/सारा नावरे 00-21, 00-21; गोल्ड खुला दुहेरी 2: आकाश सूर्यवंशी/अनिरुद्ध आपटे पराभुत वि. मिहीर आपटे/ईशान लागु 21-20, 13-21, 11-15; खुला दुहेरी 3: अनिकेत सहस्रबुद्धे/सिद्धांत खिंवसरा वि.वि.अभिजित खानविलकर/अनिरुद्ध रांजेकर 21-08, 21-12: महिला दुहेरी 4: प्रीती फडके/राजश्री भावे वि.वि.आनंदिता गोडबोले/तनया केळकर 21-11, 21-07; वाईजमन दुहेरी 5: गिरीश खिंवसरा/समीर सावला वि.वि.अनिल आगाशे/राजेश पारेख 21-07, 21-13; खुला दुहेरी 6: तुषार मेंगळे/समीर जालन वि.वि.रोहीत मेहेंदळे/शार्दुल वाळिंबे 15-13, 15-06; खुला दुहेरी 7:अद्वैत जोशी/देवेन शेवाळे पराभुत वि.आदित्य अभ्यंकर/आर्यन सुतार 15-12, 11-15, 13-15);

ऑप्टिमा फाल्कन्स वि.वि.काराज कार्डिनल्स 5-2(गोल्ड ओपन दुहेरी 1: अमर श्रॉफ/गिरीश मुजुमदार पराभुत वि.प्रतिक धर्माधिकारी/निखिल चितळे 04-21, 00-21; गोल्ड खुला दुहेरी 2: सारंग आठवले/सुधांशु मेडसीकर वि.वि.ऋषिकेश पेंडसे/ईशान भाले 21-07, 21-12; खुला दुहेरी 3: अभिजित राजवाडे/विनित रुकारी वि.वि.हर्षवर्धन आपटे/जयकांत वैद्य 21-04, 21-04; महिला दुहेरी 4: चैत्रा आपटे/पूर्णा मेहता पराभुत वि.आरुषी पांडे/गौरी कुलकर्णी 12-21, 12-21; वाईजमन दुहेरी 5: जितेंद्र केळकर/प्रशांत वैद्य वि.वि.आनंद शाह/विजय राठी 21-12, 15-21, 15-07; ओपन दुहेरी 6: तन्मय चितळे/सोहम कांगो वि.वि.आशुतोष सोमण/संदीप तपस्वी 15-11, 15-04; खुला दुहेरी 7: चैतन्य वाळिंबे/रियान करंदीकर वि.वि.क्षितिज कोतवाल/चिनार परांजपे 13-15, 15-11, 15-10).