July 24, 2024

माजी आमदार कै.विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून ३०० खेळाडू सहभागी

पुणे, ११ ऑगस्ट २०२३: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातील एकुण ३०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे १२ ते १५ऑगस्ट २०२३ या कालावधीत रंगणार आहे. 
 
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांनी सांगितले की, ही स्पर्धा पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली आणि मुश्ताक बॅडमिंटन अकादमी यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. तसेच, हि स्पर्धा 11, 13, 15, 16, 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात, तसेच 15, 17, 18 वर्षाखालील मिश्र गटात होणार आहे. स्पर्धेत सुमारे १ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. 
 
स्पर्धेत जतिन सराफ, दियान पारेख, अतिक्ष अगरवाल, कायरा रैना, दिविशा सिंग, ओवी भोसले, समीहन देशपांडे, पद्मश्री पिल्ले, सान्वी पाटील, अभिग्यान सिन्हा, अक्षर झोपे, रिधिमा जोशी, आयुषी काळे, पुर्वा वाळवंदे, हर्ष पाटील, ऋग्वेद भोसले या मानांकित खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातु, सनीज वर्ल्डच्या संचालिका मधुरा निम्हण आणि प्रताप जाधव यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ११.३० वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.