July 24, 2024

कै विनायक निम्हण स्मृती करंडक ७- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत युकेएम कोथरूड एफसी, रायजिंग पुणे संघाला विजेतेपद

पुणे, ८ ऑगस्ट २०२३: सनी  स्पोर्टस किंगडम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रिडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण स्मृती करंडक ७- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत १३ वर्षाखालील गटात युकेएम कोथरूड एफसी संघाने तर, १५ वर्षाखालील गटात रायजिंग पुणे या संघांनी विजेतेपद संपादन केले. 
 
सनी स्पोर्टस, पाषाण रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १३ वर्षाखालील गटात अंतिम लढतीत ऋषभ कनोजे(४ मि.), कार्तिकेय रेड्डी(१६ मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर युकेएम कोथरूड एफसी संघाने एसपीजे क्लबचा २-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत युकेएम कोथरूड एफसी संघाने सीएमएस फाल्कन्स संघाचा १-० असा तर, एसपीजे क्लब संघाने युकेएम कोथरूड एफसी ब संघाचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 
 
१५ वर्षांखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्यात रायजिंग पुणे संघाने एसपीजे क्लब संघाचा टायब्रेकरमध्ये ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये विजयी संघाकडून ऋषित दास, आरव संचेती, विहान घाणेकर यांनी गोल केले. 
 
याआधीच्या  उपांत्य फेरीत श्लोक साकोरे(१५ मि.), रुग्वेद पाटील(२२मि.) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एसपीजे क्लब संघाने ४ लायन बावधन संघाचा २-० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात रायझिंग पुणे संघाने ४ लायन्स पिंपळे निलख संघावर ३-१ असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. 
 
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनी निम्हण यांच्या पत्नी मधुरा निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते, क्रिडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव आणि ब्रीज सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: १३ वर्षांखालील गट: उपांत्य फेरी:

युकेएम कोथरूड एफसी: १ (ऋषभ कनोजे २० मि.)वि.वि.सीएमएस फाल्कन्स: 0;
एसपीजे क्लब: २(अर्ष सिंग २मि., आदित्य वेणी २२मि.)वि.वि.युकेएम कोथरूड एफसी ब: १(आदित्य थोरात १२मि.);
अंतिम फेरी: युकेएम कोथरूड एफसी: २ (ऋषभ कनोजे ४ मि., कार्तिकेय रेड्डी १६ मि.) वि.वि.एसपीजे क्लब: ०;

१५ वर्षांखालील गट: उपांत्य फेरी:
एसपीजे क्लब: २(श्लोक साकोरे १५ मि., रुग्वेद पाटील २२मि.) वि.वि.४ लायन बावधन: ०;
रायझिंग पुणेः ३(अथर्व मराठे ३मि., मदन पाटील ६मि., यश चौधरी १३मि.)वि.वि. ४ लायन्स पिंपळे निलख: १(इवान शेरीफ ५मि.);
अंतिम फेरी: रायजिंग पुणे: ३(ऋषित दास, आरव संचेती, विहान घाणेकर) टायब्रेकरमध्ये वि.वि.एसपीजे क्लब: २(आर्यन नांबीकर, सार्थ बिराजदार)(गोल चुकविला: शौर्य भोसले): पूर्ण वेळ: ०-०.

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट खेळाडू (१३ वर्षांखालील): कार्तिकेय रेड्डी (युकेएम कोथरूड एफसी);
सर्वोत्कृष्ट खेळाडू (१५ वर्षांखालील): सार्थ बिराजदार (एसपीजे क्लब);
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (१३ वर्षांखालील): स्वराज भुजबळ (एसपीजे क्लब)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (१५ वर्षांखालील): अंश कुमार (रायजिंग पुणे)