पुणे, २१ एप्रिल २०२५ : राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४- २५ मध्ये पुणे महापालिकाच्या इंटेलिजंट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम (आयडब्ल्यूएमएस) प्रणालीला द्वितीय क्रमांक मिळाल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहा लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार महपालिकेचे तत्कालीन आयुक्त व एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रसांत वाघमारे यांनी आज मुंबईत स्विकारला.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४- २५ आयोजित केली होती. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रणालीमुळे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पूर्वगणकपत्रक तयार करण्यापासून ते अंतिम बील देयकाची रक्कम देईपर्यंतची सर्व कामे ऑनलाईन केली जात आहेत. त्यासाठी राज्यात ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीला द्वितीय क्रमांकाचे सहा लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. हा पुरस्कार आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी