पुणे, २२ एप्रिल २०२५ : धायरी येथील जलवाहिनीतून होणारी गळती थांबविणे व अन्य कामांसाठी येत्या गुरुवारी (२४ एप्रिल) धायरी व लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.जुनी धायरी येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबविणे व पारी कंपनी रस्ता येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-
पारी कंपनी रोड, गणेशनगर, लिमयेनगर, गारमळा, गोसावी वस्ती, बारांगणी मळा, दळवी वाडी, कांबळे वस्ती, मानस परिसर, नाईक आळी, यशवंत विहार बूस्टर वरील संपूर्ण परिसर, गल्ली क्र १० ते ३४ अ व ब दोन्ही बाजू, रायकरनगर, चव्हाण बांग, त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर इत्यादी.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार