स्वारगेट, १४ मार्च २०२६ : स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी वाहतूक, जादा प्रवासी नेणे आणि भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पुणे शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान स्वारगेट वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त कारवाईत एकूण ३७५ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई स्वारगेट परिसरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणी करण्यात आली. त्यामध्ये जेधे चौक, स्वारगेट बसस्थानक (इनगेट-आउटगेट) तसेच स्वारगेट महामेट्रो स्थानकासमोरील परिसर यांचा समावेश होता.
१० मार्च रोजी १४६ रिक्षांवर कारवाई
१० मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १४६ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये :
जादा प्रवासी : १११ प्रकरणे
भाडे नाकारणे : ३२ प्रकरणे
फॉल्टी रिक्षा जप्त : ३
१२ मार्च रोजी संयुक्त कारवाई
१२ मार्च रोजी स्वारगेट वाहतूक विभाग आणि पुणे आरटीओ यांच्या संयुक्त कारवाईत आणखी १८६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये :
जादा प्रवासी : ९२
भाडे नाकारणे : २१
युनिफॉर्म नसणे : ४८
वाहतुकीस अडथळा निर्माण करणे : १८
फॉल्टी रिक्षा जप्त : ७
दरम्यान, आरटीओकडून स्वतंत्रपणे ४३ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

More Stories
Pune: मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार
पुणे महापालिकेतील नगरसेवकांना हवा बिल्ला: अमर आवळेंची मागणी
पुणे महापालिकेचे सभागृहात टाकणार कात