April 22, 2026

एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सहा भारतीय खेळाडू दुसऱ्या फेरीत

पुणे, 21 एप्रिल 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात दीपशिका विनयगमूर्ती, पार्थसारथी मुंढे, स्निग्धा कांता यांनी तर, मुलांच्या गटात समर्थ संहिता, अर्णव पापरकर, हृतिक कटकम या भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत मुलांच्या गटात भारताच्या समर्थ संहिता याने तिसऱ्या मानांकित थायलंडच्या कुनानन पँटारटोर्नचा 6-2, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. दुसऱ्या मानांकित भारताच्या अर्णव पापरकर याने कोरियाच्या ताई वू किमचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(4) असा पराभव केला. भारताच्या तविश पाहवा याने कोरियाच्या सुंगमिन लीचा 7-5, 4-6, 6-3 असा कडवा प्रतिकार केला. भारताच्या हृतिक कटकम याने ऑस्ट्रेलियाच्या राफेल सावेलीचे आव्हान 6-1, 6-2 असे मोडीत काढले.

मुलींच्या गटात भारताच्या दीपशिका विनयगमूर्ती हिने आठव्या मानांकित जपानच्या रान वाकानाचा 6-0, 7-5 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. भारताच्या
पार्थसारथी मुंढे हिने जपानच्या रे मियामोटोचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारताच्या स्निग्धा कांताने जपानच्या रिटो अरिमाला 6-1, 7-5 असे पराभूत केले. कझाकस्तानच्या आदिया ओमारबेकने सहाव्या मानांकित जपानच्या सकिनो मियाझावाचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. जपानच्या युई कोमदाने तिसऱ्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या जिझेल सिबाईचा 5-7, 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:

अर्णव पापरकर[2] (भारत)वि.वि.ताई वू किम (कोरिया)6-1, 7-6(4);

समर्थ संहिता (भारत) वि.वि.कुनानन पँटारटोर्न[3](थायलंड)6-2, 3-6, 6-4;

योशिहिरो साकुराई(जपान) वि.वि. देव पटेल (भारत)6-1, 6-1;

तविश पाहवा(भारत) वि.वि.सुंगमिन ली (कोरिया) 7-5, 4-6, 6-3;
मिन ह्युक चो[5](कोरिया) वि.वि.पंशुल उबोवेजा (भारत) 6-2, 6-2;

हृतिक कटकम (भारत) वि.वि.राफेल सावेली(ऑस्ट्रेलिया)6-1, 6-2;

रफालेंटिनो अली दा कोस्टा(इंडोनेशिया)वि.वि.हर अबीर सेखॉन(ऑस्ट्रेलिया) 6-2, 7-6(5), 6-4;

मुली:
पार्थसारथी मुंढे(भारत) वि.वि.रे मियामोटो(जपान)6-2, 6-3;
स्निग्धा कांता (भारत)वि.वि.रिटो अरिमा(जपान)6-1, 7-5;
मैलुओदी लेई[2](चीन) वि.वि.शैवी दलाल (भारत)6-0, 6-2;
मिसाकी सेकिडो(जपान) वि.वि. अल्बिना काकेनोवा(कझाकस्तान)6-2, 4-6, 6-1;
आदिया ओमारबेक(कझाकस्तान) वि.वि.सकिनो मियाझावा[6](जपान)6-2, 6-2;
युई कोमदा (जपान) वि.वि.जिझेल सिबाई[3](ऑस्ट्रेलिया)5-7, 6-4, 6-3;
दीपशिका विनयगमूर्ती (भारत)वि.वि.रान वाकाना[8](जपान)6-0, 7-5;

दुहेरी: पहिली फेरी:
कुनानन पंताराटोर्न(थायलंड)/अर्णव पापरकर (भारत)[1] वि.वि.अभिवाद्य मिश्रा (भारत)/ शरण सोमासी (भारत) 6-1, 3-6, 10-2;
रॉजर कोइके(जपान)/ माओ ताझुरू(जपान)वि.वि.तविश पाहवा (भारत) / समर्थ संहिता(भारत)7-6(6), 3-6, 10-3;
ह्यू कावनिशी (जपान) [2] /इटो कोमदा (जपान) वि.वि.मनन अग्रवाल (भारत)/नील केळकर (भारत)6-3, 6-2;
केनसुके कोबायाशी(जपान)/ कोयू यानागी(जपान)वि.वि.सुंगमिन ली(कोरिया) /सेंग-मिन ओह(कोरिया)6-1, 6-4;
निकोलस बेकर(ऑस्ट्रेलिया)/यमराली इब्राईमी(ऑस्ट्रेलिया)वि.वि.आराध्य क्षितिज (भारत)/हर अबीर सेखॉन(ऑस्ट्रेलिया)7-5, 6-4;
कोडी ऍटकिन्सन(न्यूझीलंड)/ जेक डेम्बो(ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि. इथन डोमिंगो(ऑस्ट्रेलिया)/जुन्सियो जंग(कोरिया)6-2, 6-4;

मुली:
इवा कोरीशेवा(कझाकस्तान)/आदिया ओमरबेक(कझाकस्तान) वि.वि.जेन्सी कानबर (भारत)/ दीपशिका विनयगममूर्ती (भारत)6-2, 6-1;
ऐश्वर्या जाधव (भारत)/दिया रमेश (भारत) वि.वि. रे मियामोटो(जपान)/माई सासाकी(जपान)6-4, 6-1;
एमिली चेन(ऑस्ट्रेलिया)[3] /रिओ योशिदा(जपान) वि.वि.लिसा अनझाई(जपान)/ येर्केझन झानतायेवा(कझाकस्तान)6-0 retd;
अल्बिना काकेनोवा(कझाकस्तान)/ सतीमा तोरेगेन(कझाकस्तान)वि.वि.शैवी दलाल (भारत)/ स्निग्धा कांता (भारत)6-1, 6-2;
मिकू किटाओका(जपान)/युई कोमदा (जपान)[2] वि.वि.रिहो गोटो(जपान)/ मैलुओदी लेई (चीन) 6-3, 6-3;