April 22, 2026

युएस ओपन पिकलबॉल स्पर्धेत अर्जुन व आदित्य सिंग यांना तीन सुवर्णपदके

पुणे, 21एप्रिल 2026: महाराष्ट्राच्या अर्जुन सिंग व आदित्य सिंग या जोडीने नेपल्स, फ्लोरिडा येथे पार पडलेल्या युएस ओपन पिकलबॉल स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करताना ऐतिहासिक कामगिरी बजावली. महाराष्ट्र पिकल बॉल संघटना आणि भारतीय विकल बाल संघटना यांच्या पाठिंब्याने ही कामगिरी बजावणाऱ्या अर्जुन व आदित्य सिंग यांनी जागतिक पिकल बॉल व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवताना भारतात भारतातील सर्वोत्तम गुणवान पिकलबॉल खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे. ही जोडी आता महाराष्ट्र पिकल बॉल संघटना व भारतीय पिकल बॉल संघटना आयोजित महाराष्ट्र ओपन 2026 पिकल बॉल स्पर्धेत सहभागी होत आहे.

या यशाबद्दल बोलताना आदित्य सिंग म्हणाला की, अर्जुन आणि मी आम्ही दोघांनी या स्पर्धेसाठी अतिशय कठोर परिश्रम घेतले होते आणि त्यामुळे मिळालेले यश ते समाधानकारकच आहे. राहुल कनाल आणि महाराष्ट्र पिकल बॉल संघटना यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हाच आमच्यासाठी प्रेरणादायक ठरला. त्यांच्या पाठिंब्या शिवाय हे यश मिळवणे शक्य नव्हते.

स्पर्धेत पुरुषांच्या 5.0 दुहेरी गटात आदित्य व अर्जुन सिंग यांनी रायडर ब्राऊन व सोली मेसेरी यांचा 11-01, 11-05 असा पराभव करून सुवर्णपदकांची कमाई केली.

18 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीतही आदित्य व अर्जुन सिंग यांनी जॉय मोइदी व रिकी लिन या अव्वल मानांकित जोडीला 09-11, 11-02, 11-07 असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर पुरुषांच्या 5.0 एकेरीत अर्जुन सिंग याने एष्टन पीटरसनचा 13-11, 11-06 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

यु एस ओपन पिकल बॉल स्पर्धेत स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावून भारतीय व महाराष्ट्र निकाल संघटनेच्या सर्वांष पाठिंबा शिवाय शक्यच नव्हते असं सांगून अर्जुन सिंग म्हणाला की, राहुल कनाल सर यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. कोणत्याही खेळाडूला सर्वोच्च स्तरावर यश मिळवण्यासाठी काय आवश्यक असते ते त्यांना अचूक माहिती आहे. त्याचाच आम्हाला फायदा झाला. आता आगामी महाराष्ट्र ओपन स्पर्धेत आणि भारतातील अन्य स्पर्धांमध्ये ही यशोमलिका कायम राखण्याचा आम्हाला विश्वास वाटतो.