May 30, 2026

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए), पूना क्लब संघांची विजयी आगेकूच

पुणे, दि.28 मे 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए), पूना क्लब या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

सिंहगड क्रिकेट मैदानावरील लढतीत आयुष रक्ताडे(1-54 व नाबाद 77) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) संघाने अँबिशियस संघाचा 5 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.

पूना क्लब मैदानावरील लढतीत वेदांत गोरे(140धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह ऋग्वेद चौधरी(5-50) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने ट्रिनिटी संघाचा 19 धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदानावरील सामन्यात वरद चत्तर(नाबाद 119धावा व 3-27) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने स्टार्स क्रिकेट क्लब संघावर 202 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

डिझायर क्रिकेट मैदानावरील लढतीत धीरज ढेरे(29धावा व 3-9) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर केडन्स संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा 59 धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला. डेक्कन जिमखाना मैदानावरील लढतीत दक्ष दुहुन(3-31) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पारसी जिमखाना संघाचा 3 गडी राखून पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:
डेक्कन जिमखाना मैदान:
पारसी जिमखाना: 41.1 षटकात सर्वबाद 155 धावा(शिवम गोरे 30, आर्यन कदम 27, सिद्धांत 27, मोहम्मद वसीम 27, दक्ष दुहुन 3-31, आयुष बकरोला 2-30, आर्यन काळंबेंदे 2-18, सोहम काकडे 2-25) पराभुत वि.डेक्कन जिमखाना: 34 षटकात 7बाद 158 धावा(सारस जोगी 50(76,5×4),सार्थक बिराजदार 26, विहान केंजळे 24, शिवम गोरे 3-40, सर्वेश वाघमारे 2-20);सामनावीर-दक्ष दुहून; डेक्कन जिमखाना 3 गडी राखून विजयी;

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदान:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 42 षटकात 7बाद 342धावा(वरद चत्तर नाबाद 119(83,11×4,5×6), अथर्व काळे 57(46,7×4,1×6), अथर्व औटे 39, अभिषेक टोपनो 24, जय गोंदकर 23, सुदर्शन तोरडमल नाबाद 25, चैतन्य पवार 4-58, पंकज डोंगरे 2-61) वि.वि.स्टार्स क्रिकेट क्लब: 39.5 षटकात सर्वबाद 140धावा(श्रीयश बिऱ्हाडे 40(86,3×4), शौर्य जाखळेकर नाबाद 34(71,5×4), अनिश भोसले 20, वरद चत्तर 20, वरद चत्तर 3-27, सुदर्शन तोरडमल 3-21, अथर्व काळे 3-17);सामनावीर-वरद छत्तर; व्हेरॉक 202 धावांनी विजयी;

सिंहगड क्रिकेट मैदान:
अँबिशियस: 43.5 षटकात सर्वबाद 252धावा(गुंजन सावंत 71(77,8×4,2×6), आदित्य कापरे 44(59,5×4,1×6), अभिनव केंगर 31, ओंकार कदम 31, अर्जुन साळुंके नाबाद 19, व्यंकटेश बेहेरे 3-55, अनिश जोशी 1-36, आयुष रक्ताडे 1-54) पराभूत वि.पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए): 32.3 षटकात 5बाद 254धावा(अनिश जोशी नाबाद 66(63,9×4,1×6), आयुष रक्ताडे नाबाद 77(38,5×4,6×6), ओम भामरे 37, इंद्रजीत शिंदे 26, राघव नाईक 26, आर्यन यादव 2-37, अनुराग सिंग 2-58); सामनावीर-आयुष रक्ताडे; पीबीसीए 5 गडी राखून विजयी;

पूना क्लब मैदान:
पूना क्लब: 45 षटकात 6बाद 307धावा(वेदांत गोरे 140(96,11×4,9×6), मयंक अगरवाल 53(76,5×4,1×6), श्रेयस शिवरकर 56(49,3×4,3×6), रुद्र पाटील 2-27) वि.वि.ट्रिनिटी: 42 षटकांत सर्वबाद 288धावा(प्रेम इघे 81(79,7×4,4×6), अमन सिंग 63(45,3×4,5×6), आयुष गुप्ता 63(46, 2×4,5×6), राजवीर देशमुख 34, ऋग्वेद चौधरी 5-50, आर्यन हिंगणे 3-28);सामनावीर-वेदांत गोरे; पूना क्लब 19 धावांनी विजयी;

डिझायर क्रिकेट मैदान:
केडन्स: 44.2 षटकात सर्वबाद 215धावा(सुफियान सय्यद 41(40,3×4,2×6), मोहित कटारिया 35, संस्कार सोनवणे 31, धीरज ढेरे 29, पार्थ निंबाळकर 17, अर्जुन माहुली 17, अर्पण धार 3-23, ओंकार वाघ 3-52, साकेत श्याम 2-37) वि.वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 32.5 षटकात सर्वबाद 156धावा(प्रणव ठोंगे 58(45,10×4,1×6), अर्पण धार 54(54,8×4,1×6), राघव शेवाळे 18, अर्णव अग्रवाल 3-10, धीरज ढेरे 3-9, मोहम्मद मुजावर 2-46);सामनावीर -धीरज ढेरे; केडन्सने 59 धावांनी विजयी.

You may have missed