पुणे, 27 मे 2026: शारदा स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ऋग्वेद दांडेकर, पुष्कर चक्रदेव, अनुज फुलसुंदर, नील नवरे, नीरजा देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
शारदा स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित ऋग्वेद दांडेकर याने अव्वल मानांकित आर्यन वानखेडेचा 11-9,6-11,5-11,11-9,11-8 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. बिगर मानांकित पुष्कर चक्रदेव याने चौथा मानांकित धैर्य शहाचा 11-3,12-10,9-11,11-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. याच मुलींच्या गटात पाचव्या मानांकित नीरजा देशमुख हिने चौथ्या मानांकित स्पृहा गुजरवर 9-11,11-5,11-6,11-9 असा विजय मिळवला.
19वर्षाखालील मुलांच्या गटात आठव्या मानांकित
अनुज फुलसुंदर याने अव्वल मानांकित प्रणव घोळकरचा 11-8,11-9,8-11,11-6 असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. पाचव्या मानांकित
नील नवरे याने चौथ्या मानांकित श्रेयस माणकेश्वरला 12-10,11-4,9-11,11-6 असे पराभूत केले.
निकाल: 15वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
ऋग्वेद दांडेकर [8] वि.वि.आर्यन वानखेडे[1] 11-9,6-11,5-11,11-9,11-8
पुष्कर चक्रदेव वि.वि.धैर्य शाह[4] 11-3,12-10,9-11,11-4;
शारंग गवळी[3] वि.वि.नक्ष महाजन 11-8,11-5,11-6;
वरदान कोलते वि.वि.निरज नांदेडे 11-8,7-11,11-4,11-9;
15 वर्षाखालील मुली:
दिया शिंदे [1] वि.वि.शरण्या पटवर्धन[8] 11-5,11-7,11-5;
नीरजा देशमुख[5] वि.वि.स्पृहा गुजर[4] 9-11,11-5,11-6,11-9;
अनन्या पाटील वि.वि.श्रीनिका उमेकर 11-9,7-11,11-5,11-2;
सानवी नवांगुल वि.वि.अरिहा मोरे 11-3,11-2,9-11,11-5;
19 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
रुचिता दारवटकर[1] वि.वि. मेधा कोत्रा[8]11-3,11-3,11-6!
जान्हवी फणसे[4] वि.वि.मृदुला सुरवसे[5]11-13,11-6,11-8,11-5;
स्वरदा साने[3] वि.वि.आद्या गवात्रे[6] 10-12,12-10,11-4,11-6;
सई कुलकर्णी[2] वि.वि.निधी भांडारकर[7]11-6,11-9,11-7;
19वर्षाखालील मुले:
अनुज फुलसुंदर[8] वि.वि.प्रणव घोळकर[1] 11-8,11-9,8-11,11-6;
नील नवरे[5] वि.वि.श्रेयस माणकेश्वर[4] 12-10,11-4,9-11,11-6;
कौस्तुभ गिरगावकर[3] वि.वि.निशाद लेले[6] 11-6,11-8,7-11,11-9;
इशान खांडेकर[2] वि.वि.शौरेन सोमण[7] 9/
-11,11-8,11-9,11-7;
17वर्षांखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी:
सई कुलकर्णी[1] वि.वि.वैदेही दाढीच 11-5,11-5,11-4;
श्रेया कोठारी[8] वि.वि.डायना पटेल 11-4,11-1,3-11,11-8;
मृदुला सुरवसे[5] वि.वि.ईशा जोशी 11-4,11-9,11-5;
श्रेया गायकवाड[4] वि.वि. स्पृहा बोरगावकर 2-11,11-7,8-11,11-7,12-10;
आद्या गवात्रे[3] वि.वि.अनन्या पाटील 7-11,11-8,10-12,11-6,11-9;
नीरजा देशमुख[6] वि.वि.सिया बजाज 11-5,11-1,11-1;
दिया शिंदे[7] वि.वि.मेधा कोट्रा 11-7,12-14,11-8,4-11,11-6;
स्वरदा साने[2] वि.वि.स्पृहा गुजर 11-3, 11-4, 11-3;
17वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
एल्विस टॉम वि.वि.ध्रुव कुंभार 7-11,11-6,15-13,11-8;
अद्विक कदम वि.वि.शिवांक शहा 11-7,8-11,9-11,11-4,11-2;
आर्यन वानखेडे[8] वि.वि.धैर्य शहा 11-2,11-6,11-8;
निशाद लेले[5] वि.वि.एमव्ही यशस्वी 11-5,13-11,11-9;
अर्णव सरपोतदार वि.वि.ऋग्वेद दंडाणे 11-6,11-8,11-4;
अनुज फुलसुंदर [4] वि.वि.अथर्व सिंग चाहर 11-8,11-4,11-4;
नील नवरे[3] वि.वि.आर्यन मोरे 11-5,11-6,11-7;
निरव मुळ्ये वि.वि.रुद्र पुंडलिक 11-5,11-6,11-2.

More Stories
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए), पूना क्लब संघांची विजयी आगेकूच
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र संघांचा दुसरा विजय
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 409 खेळाडू सहभागी