पुणे, 29 मे 2026: ऐम टेनिस अकादमी यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन्स पुणे यांच्या सहकार्याने आयोजित एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत देशभरातून 150 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे दि.30 मे ते 5 जून 2026 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक केतन धुमाळ यांनी सांगितले की, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांनी दिलेल्या भरघोस पाठींब्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणांहून 150 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये राज्यातील जान्हवी सावंत, स्वरा पवार, वाण्या अगरवाल, अन्वी चिटणीस, ख्याती मनीष, आवीर घुमरे, लव परदेशी, हरयाणाच्या आकाश बोरा, उत्तर प्रदेशच्या आदमया भांडोरिया हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवीण झिटे यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्याला 50 एआयटीए गुण व करंडक तर उपविजेत्याला 40 गुण व करंडक पारितोषिक मिळणार आहे.

More Stories
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड
Pune: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता याला विजेतेपदाचा मान