पुणे, ३१ ऑगस्ट २०२६ : गणेशोत्सवातील डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापरावरून पुण्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा जपत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी डीजे बंद करण्याचे थेट आवाहन केले नसले तरी डीजेच्या वादापासून दूर राहून सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याच्या त्यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, डीजे हा गणेशोत्सवाच्या संस्कृतीचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या मंडळांकडूनही याबाबत भूमिका मांडली जात आहे. दुसरीकडे, ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनासमोर उत्सवाचा उत्साह आणि ध्वनिप्रदूषणाचे नियम यांच्यात समतोल साधण्याचे आव्हान आहे.
डीजे, लाऊडस्पीकर आणि फटाक्यांच्या वापराबाबत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

More Stories
खेड-शिवापूर परिसरात दुर्मिळ खवले मांजराचे रेस्क्यू; सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्तता
पुण्यात हजारो MPSC स्पर्धकांचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा; कथित गैरप्रकारांवर कारवाईची मागणी
तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक: पोलीस आयुक्त अमितेश कुमार