पुणे, १० जुलै २०२६ : संतांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगरपालिकेने पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबवत अवघ्या एका दिवसात २७१.८४१ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन केले. या मोहिमेत महापालिकेच्या १,१२० सेवकांनी पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळांची स्वच्छता करून वारकऱ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले.
महापालिकेच्या अहवालानुसार, संकलित कचऱ्यामध्ये ५४.४६२ मेट्रिक टन ओला तर २१७.३७९ मेट्रिक टन सुका कचरा होता. सर्वाधिक १०२.५५० मेट्रिक टन कचरा कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून संकलित करण्यात आला. त्यापाठोपाठ नगररोड-वडगावशेरी क्षेत्रातून ५०.३०० मेट्रिक टन, वारजे-कर्वेनगर क्षेत्रातून ४२.०२५ मेट्रिक टन आणि विश्रामबागवाडा क्षेत्रातून २१.९७० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला.
पालखी मार्गावरील स्वच्छता, कचरा संकलन आणि तातडीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू ठेवण्यात आली. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या सेवकांनी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सातत्याने काम करत पालखी मार्ग स्वच्छ व निर्मळ ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन