पुणे, दि.7 सप्टेंबर 2026- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत नाडगोंडे रेव्हन्स, वन लिटिल फार्म सनबर्डस, जोग कॉमेट्स, बेल्फिन्स टायगर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात साखळी फेरीत अ गटात प्रतीक धर्माधिकारी, सारा नवरे, चंद्रशेखर आपटे, चिन्मय चिरपुटकर, प्रांजली नाडगोंडे, विनित राठी, आशय कश्यप, आर्यन गाडगीळ, सारा नवरे, रिआन करंदीकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर नाडगोंडे रेव्हन्स संघाने इम्पेरिअल स्वान्स संघाचा 5-2 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या लढतीत वन लिटिल फार्म सनबर्डस संघाने एरियल स्विफ्टस संघावर 4-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. विजयी संघाकडून सुधांशू मेडसीकर, इशान कुदळे, इशान भाले, आदित्य अभ्यंकर, आदित्य दिवेकर, देवेन शेवाळे, श्रेयस भामरे, गौरी कुलकर्णी यांनी सुरेख कामगिरी बजावली.
अन्य लढतीत ब गटात ईशान लागू, निखिल चितळे, तन्मय चोभे, नेहा लागू, बाळ कुलकर्णी, परीक्षित देवल, कर्णा मेहता, यश मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, तनिश बेलगलकर यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर बेल्फिन्स टायगर्स संघाने फाल्कन ऑप्टीमा संघाचा 5-2 असा पराभव करून विजयी सुरुवात केली. जोग कॉमेट्स संघाने कारा इंटलेक्ट कियाज संघाचा 5-2 असा सहज पराभव केला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल आणि उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगल चे सोहम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सह सचिव सारंग लागू, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, आमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
अ गट: नाडगोंडे रेव्हन्स वि.वि. इम्पेरिअल स्वान्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी 1: प्रतीक धर्माधिकारी/सारा नवरे वि.वि.आदित्य काळे/अर्जुन खानविलकर 15-10, 15-07; खुला दुहेरी 3: चंद्रशेखर आपटे/चिन्मय चिरपुटकर वि.वि.ईशान पारेख/निखिल भाटे 15-03, 15-09; प्रौढ दुहेरी 4: अविनाश दोशी/विश्वास मोकाशी पराभूत वि.संजय परांडे/सुदर्शन बिहाणी 10-15, 12-15; प्रौढ दुहेरी 5: मनीष शहा/समीर सावळा पराभूत वि.अनुराग आंबेकर/श्रीदत्त शानबाग 07-15, 11-15; खुला दुहेरी 6: प्रांजली नाडगोंडे/विनित राठी वि.वि.अगस्त्य कुंटे/रोहन पै 15-10, 15-09; खुला दुहेरी 7: आशय कश्यप/आर्यन गाडगीळ वि.वि.अनीश घैसास/ऋचा जोशी 16-14, 15-07; मिश्र दुहेरी 2: सारा नवरे/रिआन करंदीकर वि.वि.इशा साठे/तन्मय आगाशे 15-13, 15-13);
अ गट: वन लिटिल फार्म सनबर्डस वि.वि.एरियल स्विफ्टस 4-3(गोल्ड खुला दुहेरी 1: सुधांशू मेडसीकर/इशान कुदळे वि.वि.सोहम कांगो/अमित देवधर 12-15, 15-11, 15-11; खुला दुहेरी 3: इशान भाले/आदित्य अभ्यंकर वि.वि.अनिश रुईकर/सोहम गाडगीळ 12-15, 15-09, 15-06; प्रौढ दुहेरी 4: देवेंद्र चितळे/राजेश पारेख पराभूत वि.सिद्धार्थ साठे/हेमंत करमरकर 11-15, 07-15; प्रौढ दुहेरी 5: मकरंद चितळे/अनिल देडगे पराभूत वि.तुषार नगरकर/रोहन जोशी 12-15, 21-19, 06-15; खुला दुहेरी 6: आदित्य दिवेकर/देवेन शेवाळेवि.वि.आदित्य जितकर/आर्यन सुतार 08-15, 15-05, 15-13; खुला दुहेरी 7: सौरभ प्रभुदेसाई/हिमांशू थोरात पराभूत वि.अमोल दामले/नीलेश बजाज 08-15, 09-15; मिश्र दुहेरी 2: श्रेयस भामरे/गौरी कुलकर्णी वि.वि.रोहित भालेराव/संध्या भट 15-03, 15-09);
ब गट: जोग कॉमेट्स वि.वि.कारा इंटलेक्ट कियाज 5-2((गोल्ड ओपन दुहेरी 1: नितीन कोनकर/विमल हंसराज वि.वि.हृषीकेश पेंडसे/रणजित पांडे 13-15, 15-07, 15-11; खुला दुहेरी 3: विनित रुकारी/हृषिता खुर्जेकर वि.वि.राजवीर बोरावके/यश शहा 15-12, 15-10; प्रौढ दुहेरी 4: अजय पटवर्धन/विवेक लिमये पराभूत वि.सिद्धार्थ निवसरकर/बिपिन देव 08-15, 07-15; प्रौढ दुहेरी 5: अनिल आगाशे/संदीप साठे पराभूत वि.बिपिन चोभे/गौतम लोणकर 11-15, 05-15; खुला दुहेरी 6: अश्विन जोशी/कपिल बाफना वि.वि.नचिकेत जोशी/स्वरूप कुलकर्णी 15-11, 15-06; खुला दुहेरी 7: प्रथम पारेख/जय केळकर वि.वि.नकुल बेलवलकर/प्रिशा पटवर्धन 10-15, 15-07, 15-12; मिश्र दुहेरी 2: अदिती रोडे/पराग चोपडा वि.वि.आरुषी पांडे/आकाश सूर्यवंशी 06-15, 15-12, 15-13);
गट ब: बेल्फिन्स टायगर्स वि.वि.फाल्कन ऑप्टीमा 5-2(गोल्ड ओपन दुहेरी 1: ईशान लागू/निखिल चितळे वि.वि.सारंग आठवले/अनिरुद्ध आपटे 15-11, 15-09; खुला दुहेरी 3: तन्मय चोभे/नेहा लागू वि.वि.नीरज दांडेकर/प्रिती फडके 15-07, 13-15, 15-11; प्रौढ दुहेरी 4: आमोद प्रधान/जयकांत वैद्य पराभूत वि. अभिजित राजवाडे/संजय शहा 08-15, 12-15; प्रौढ दुहेरी 5: बाळ कुलकर्णी/परीक्षित देवल वि.वि.सचिन जोशी/सचिन काळे 15-04, 15-04; खुला दुहेरी 6: कर्णा मेहता/यश मेहेंदळे वि.वि.सुमित नेरकर/वरूण निवर्गी 15-10, 15-12; खुला दुहेरी 7: अभिषेक ताम्हाणे/तनिश बेलगलकर वि.वि.विक्रम ओगळे/अन्वित राजवाडे 15-11, 15-10; मिश्र दुहेरी 2: मिहीर विंझे/प्रीती सप्रे पराभूत वि.वरद चितळे/राजश्री भावे 08-15, 10-15).

More Stories
बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत नाडगोंडे रेव्हन्स संघाला विजेतेपद
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का