पुणे, दि.13 सप्टेंबर 2026- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत नाडगोंडे रेव्हन्स संघाने बेल्फिन्स टायगर्स संघाचा 4-3 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात अंतिम फेरीच्या लढतीत गोल्ड खुल्या दुहेरी 1मध्ये रेव्हन्सच्या प्रतीक धर्माधिकारी व केदार नाडगोंडे यांनी टायगर्सच्या इशान लागू व निखिल चितळे यांचा 15-11, 15-12 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर खुल्या दुहेरी 3 मध्ये टायगर्सच्या मिहिर विंझे व प्रीती सप्रे यांनी मनीष शहा व प्रांजली नाडगोंडे यांचा 15-03, 15-07 असा पराभव करून बरोबरी साधली. प्रौढ दुहेरी 4 मध्ये टायगर्सच्या अमोद प्रधान व आनंद घाटे यांनी अविनाश दोशी व समीर सावला यांचा 16-14, 17-15 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. प्रौढ दुहेरी 5 मध्ये रेव्हन्सच्या चंद्रशेखर आपटे व विश्वास मोकाशी यांनी बाळ कुलकर्णी व परीक्षित देवल यांचा 20-18, 15-09 असा पराभव केला. खुल्या दुहेरी 6 मध्ये टायगर्सच्या कर्णा मेहता व यश मेहेंदळे यांनी आशय कश्यप व विनित राठी यांचा 11-15, 16-14, 15-13 असा तर, खुल्या दुहेरी 7 मध्ये रेव्हन्सच्या चिन्मय चिरपुटकर व पृथ्वी शहा यांनी अभिषेक ताम्हाणे व तनिश बेलगलकर यांचा 15-12, 15-08 असा पराभव केला. मिश्र दुहेरी 2 मध्ये रेव्हन्सच्या रिआन करंदीकर याने सारा नवरेच्या साथीत तन्मय चोभे व नेहा लागू यांचा 15-07, 12-15, 15-10 असा पराभव करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दिपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू, ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगलचे सोहम जोशी, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, आमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
नाडगोंडे रेव्हन्स वि.वि. बेल्फिन्स टायगर्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी 1: प्रतीक धर्माधिकारी/केदार नाडगोंडे वि.वि.इशान लागू/निखिल चितळे 15-11, 15-12; खुला दुहेरी 3: मनीष शहा/प्रांजली नाडगोंडे पराभूत वि. मिहिर विंझे/प्रीती सप्रे 03-15, 07-15; प्रौढ दुहेरी 4: अविनाश दोशी/समीर सावला पराभूत वि. अमोद प्रधान/आनंद घाटे 14-16, 15-17; प्रौढ दुहेरी 5: चंद्रशेखर आपटे/विश्वास मोकाशी वि.वि. बाळ कुलकर्णी/परीक्षित देवल 20-18, 15-09; खुला दुहेरी 6: आशय कश्यप/विनित राठी पराभूत वि. कर्णा मेहता/यश मेहेंदळे 15-11, 14-16, 13-15; खुला दुहेरी 7: चिन्मय चिरपुटकर/पृथ्वी शहा वि.वि.अभिषेक ताम्हाणे/तनिश बेलगलकर 15-12, 15-08; मिश्र दुहेरी 2: रिआन करंदीकर/सारा नवरे वि.वि. तन्मय चोभे/नेहा लागू 15-07, 12-15, 15-10.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट जोडी (गोल्ड दुहेरी): केदार नाडगोंडे/प्रतीक धर्माधिकारी;
सर्वोत्कृष्ट जोडी(सिल्वर दुहेरी): कर्णा मेहता/यश मेहेंदळे;
सर्वोत्कृष्ट जोडी (ब्राँझ दुहेरी): अभिषेक ताम्हाणे/तनिश बेलगलकर;
सर्वोत्कृष्ट जोडी(प्रौढ दुहेरी): मकरंद चितळे/अनिल देडगे;
सर्वोत्कृष्ट जोडी(मिश्र दुहेरी): रिआन करंदीकर/सारा नवरे;
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (पुरुष): प्रतीक धर्माधिकारी/कर्णा मेहता;
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट(महिला): सारा नवरे;
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट(प्रौढ): सिद्धार्थ साठे/हेमंत करमरकर;
उदयोन्मुख खेळाडू: अन्वित राजवाडे;
मॅच ऑफ द टूर्नामेंट: ईशान लागू/निखिल चितळे वि. अनिश राणे/कृष्णनिल गोरे.

More Stories
बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत नाडगोंडे रेव्हन्स, वन लिटिल फार्म सनबर्डस, जोग कॉमेट्स, बेल्फिन्स टायगर्स संघांची विजयी सलामी
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का