September 21, 2026

बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत बेल्फिन्स टायगर्स व नाडगोंडे रेव्हन्स यांच्यात अंतिम लढत

पुणे, दि.12 सप्टेंबर 2026- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उपांत्य फेरीत नाडगोंडे रेव्हन्स व बेल्फिन्स टायगर्स या संघांनी अनुक्रमे फाल्कन ऑप्टिमा व वन लिटिल फार्म सनबर्ड्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात उपांत्य फेरीत पहिल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्स संघाने फाल्कन ऑप्टिमा संघाचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून प्रतीक धर्माधिकारी, केदार नाडगोंडे, आशय कश्यप, चिन्मय चिरपुटकर, मनीष शहा, विश्वास मोकाशी, अविनाश दोशी, पृथ्वी शहा यांनी अफलातून कामगिरी केली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत ईशान लागू, निखिल चितळे, मिहीर विंझे, यश मेहेंदळे, बाळ कुलकर्णी, परीक्षित देवल, कर्णा मेहता, प्रीती सप्रे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर बेल्फिन्स टायगर्स संघाने वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

निकाल: उपांत्य फेरी:
नाडगोंडे रेव्हन्स वि.वि.फाल्कन ऑप्टिमा 4-2(गोल्ड खुला दुहेरी 1: प्रतीक धर्माधिकारी/केदार नाडगोंडे वि.वि.सारंग आठवले/अनिरुद्ध आपटे 11-15, 17-15, 15-04; खुला दुहेरी 3: आशय कश्यप/चिन्मय चिरपुटकर वि.वि.प्रीती फडके/सचिन जोशी 15-00, 15-00; प्रौढ दुहेरी 4: चंद्रशेखर आपटे/समीर सावला पराभूत वि.अभिजित राजवाडे/सचिन काळे 00-15, 00-15; प्रौढ दुहेरी 5: मनीष शहा/विश्वास मोकाशी वि.वि.संजय शहा/विजय राठी 15-00, 15-00; खुला दुहेरी 6: प्रांजली नाडगोंडे/विनीत राठी पराभूत वि.सुमित नेरकर/वरूण निवर्गी 08-15, 08-15; खुला दुहेरी 7: अविनाश दोशी/पृथ्वी शहा वि.वि. नीरज दांडेकर/अन्वित राजवाडे 13-15, 15-10, 15-12);

बेल्फिन्स टायगर्स वि.वि.वन लिटिल फार्म सनबर्ड्स 4-1 (गोल्ड खुला दुहेरी 1: ईशान लागू/निखिल चितळे वि.वि.सुधांशू मेडसीकर/ईशान कुदळे 17-15, 15-06; खुला दुहेरी 3: मिहीर विंझे/यश मेहेंदळे वि.वि.देवेंद्र चितळे/अक्षय ओक 15-1, 15-1; प्रौढ दुहेरी 4: आमोद प्रधान/आनंद घाटे पराभूत वि.मकरंद चितळे/अनिल देडगे 09-15, 11-15; प्रौढ दुहेरी 5: बाळ कुलकर्णी/परीक्षित देवल वि.वि.सौरभ प्रभुदेसाई/राजेश पारेख 15-00, 15-00; खुला दुहेरी 6: कर्णा मेहता/प्रीती सप्रे वि.वि.ईशान भाले/आदित्य अभ्यंकर 13-15, 16-14, 19-17).