पुणे, २४/०४/२०२३: ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळू उर्फ चक्रधर रानबा गोडसे (वय.30,रा. टाकळीलोणार,ता.श्रीगोंदा,जि.
बाळु याच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 19 एप्रिल रोजी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी, पोलिस कर्मचारी प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली आहे.
ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 26 मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. फिर्यादी प्रकाश मांडगे व संजय कोतकर हे कर्तव्यावर होते. दरम्यान मांडगे हे आरोपीला डिस्चार्ज कधी होणार आहे हे विचारण्यासाठी गेले होते. तर कोतकर हे वॉशरुमला गेले होते. त्यावेळी आरोपीने बेडीमधून हात काढून कर्मचार्यांची नजर चुकावून गर्दीचा व अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. बाळु हा मिळून न आल्यामुळे मांगडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी