पुणे, 9 डिसेंबर 2024: १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या महोत्सवात भव्य पुस्तक प्रदर्शनासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीला खोलवर रुजवणाऱ्या अनेक कार्यक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे.
हा सोहळा अधिक विशेष आहे कारण यावेळी पुणे पुस्तक महोत्सव ३ विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे. याची नोंद ‘गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये देखील होणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
जनसहभागला केंद्रबिंदू मानून हा महोत्सव रंगणार आहे. ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत संपूर्ण पुणे शहरात ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. याअंतर्गत लाखो पुणेकर एकाच वेळी ज्या स्थितीत असतील तिथे पुस्तक वाचन करणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी QR कोड देण्यात येणार आहे. त्यामध्ये वाचकांनी पुस्तकाचे नाव, वाचण्याचे ठिकाण आणि सोबत एक फोटो देणे अपेक्षित आहे.
मागील वर्षी हजारोंच्या संख्येने असलेला सहभाग यावर्षी लाखोंमध्ये रूपांतरित होईल अशी अपेक्षा आहे.
चला, एकत्र येऊया आणि हा महोत्सव यशस्वी करूया..!

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन