December 2, 2023

एमएसएलटीए भारती विद्यापीठ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकूण 134 खेळाडू सहभागी

पुणे, 29 सप्टेंबर 2023: संदीप किर्तने टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए भारती विद्यापीठ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत देशभरातून एकूण 134 अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे दि.30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक संदीप किर्तने आणि संयोजन सचिव डॉ. विक्रांत साने यांनी सांगितले की, तसेच, ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत मुलांच्या गटात
दक्ष पाटील, शौनक सुवर्णा, वरद उंद्रे, सक्षम भन्साळी, स्मित उंद्रे, जय गायकवाड, रोहन बजाज, तर मुलींच्या गटात स्वनिका रॉय, आरोही देशमुख, मायरा टोपनो, स्वरा जावळे, काव्या देशमुख, श्रावी देवरे, रित्सा कोंडकर हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रविण झिटे यांची एमएसएलटीए सुपर वायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने शनिवार, 30 ऑक्टोबर व रविवार, 1 ऑक्टोबर रोजी, तर मुख्य ड्रॉ 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती संदीप किर्तने यांनी दिली.