पुणे, 30 सप्टेंबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत राहुल क्रिकेट अकादमी, पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून पहिला विजय मिळवला.
सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रतिक कडलक(182 धावा) याने केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर राहुल क्रिकेट अकादमी संघाने सनराईज क्रिकेट स्कुल संघावर 258 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना राहुल क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 8बाद 352 धावा केल्या. यात प्रतिक कडलकने 119 चेंडूत 27चौकार व 2 षटकारासह 182 धावांची तुफानी खेळी केली. त्याला सार्थक ढमढेरेने 42चेंडूत 9चौकाराच्या मदतीने 56 धावा काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने ८८ चेंडूत ११९ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रतिक याने कृष्णा पायगुडे(नाबाद 46)च्या साथीत चौथ्या गडयासाठी ९१ चेंडूत १३७ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात सनराईज क्रिकेट स्कूल संघाचा डाव 22.1 षटकात सर्वबाद 94 धावावर कोसळला. यात ऋतुराज मुरकुटे 20, शुभंकर म्हंकाळे 13, अर्णव डोबळे 17 यांनी थोडासा प्रतिकार केला. राहुल क्रिकेट अकादमीकडून साई कुंभार(1-7), क्षितीज पिंगळे(1-1), श्रेयस फडतरे(1-11),ओम वायकर(1-11), प्रणित जगताप(1-11), दीप पाटील (1-17) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात श्रवण पणिकर(115 धावा) याने केलेल्या अफलातून फलंदाजीसह अनुराग सिंग(4-40 व 77धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी संघाने 22 यार्डस क्रिकेट अकादमी संघावर 5 गडी राखून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सनराईज स्कूल मैदान: राहुल क्रिकेट अकादमी: 45 षटकात 8बाद 352धावा(प्रतिक कडलक 182(119,27×4,2×6), सार्थक ढमढेरे 56(42,9×4), कृष्णा पायगुडे नाबाद 46(54,5×4), प्रसाद आंबळे 17, अवनीश कुलकर्णी 3-45)वि.वि.सनराईज क्रिकेट स्कूल: 22.1 षटकात सर्वबाद 94 धावा(ऋतुराज मुरकुटे 20, शुभंकर म्हंकाळे 13, अर्णव डोबळे 17, साई कुंभार 1-7, क्षितीज पिंगळे 1-1, श्रेयस फडतरे 1-11,ओम वायकर 1-11, प्रणित जगताप 1-11, दीप पाटील 1-17); सामनावीर-प्रतिक कडलक; राहुल क्रिकेट अकादमी 258 धावांनी विजयी;
सहारा क्रिकेट मैदान: 22 यार्डस क्रिकेट अकादमी: 44.4 षटकात सर्वबाद 235 धावा(ऋषभ जोशी 85(81,14×4,2×5), ऋषिराज कड 37(74,6×4,1×6), नीलमेघ नागवकर 37(44,4) ×4,1×6), युवराज भाटिया 19, अनुराग सिंग 4-40, ऋषभ थोरात 3-27)पराभुत वि.पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी: 32.1 षटकात 5बाद 236धावा(श्रवण पणिकर 115(88,14×4,8) ×6), अनुराग सिंग 77(48,10×4,5×6), डॅनियल शेख 2-61, संकल्प शेडगे 1-30); सामनावीर-अनुराग सिंग; पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी 5 गडी राखून विजयी;
More Stories
पुणे: पीवायसी व दोशी इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील खेळाडूंसाठी 16 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात