पुणे, ४ सप्टेंबर २०२४: पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पालिका कार्यक्षेत्रातील पालिका आणि खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या एकूण १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यामधील पुणे पालिका प्राथमिक शाळेतील १० आणि खाजगी प्राथमिक शाळेतील ५ शिक्षक आहेत. सकाळी ११ बालगंधर्व रंगमंदिर येथे यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आणि पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ९० प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विभागाकडे आले होते. राज्यसरकारच्या निकषाप्रमाणे निवड समितीमार्फत कागदपत्रे पडताळणी, मुलाखत व वर्गभेटीद्वारे आलेल्या प्रस्तावामधून आदर्श शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे.आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि टॅब देवून पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या पालिकेच्या प्राथमिकच्या शिक्षकांची नावे आणि शाळा पुढील प्रमाणे : सुनिता धर्मा गायकवाड मनपा शाळा क्र. १८१ मुलांची, खराडी, सुलताना अन्सार मण्यार सावित्रीबाई फुले, विद्यानिकेतन ४, गाडीतळ, हडपसर, चेता बाळकृष्ण गोडसे मनपा शाळा वाघोली शाळा क्र.। वाघोली, ललिता बाबासाहेब चौरे मनपा शाळा क्र. ८७ मुलींची, गाडीतळ, हडपसर, बलभीम शिवाजी बोदगे मनपा शाळा क्र. १२ मुलांची काळेबोराटे नगर, निशिगंधा विजय आवारी मनपा शाळा क्र. १९ मुलींची खराडी, किरण कृष्णकांत गोफणे मनपा शाळा क्र. ८७ मुलींची, गाडीतळ, हडपसर, सोनाली सोमनाथ शिवले मनपा शाळा क्र. ९९ मुलींची वडगावशेरी, गणेश भगवान राऊत मनपा शाळा क्रमांक १७१ मुलांची काळे बोराटे नगर, शर्मिला समीर गायकवाड मनपा शाळा क्र. ८२ मुलींची कोंढवा, पुणे.आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या खाजगी शाळेतील शिक्षकांची नावे आणि शाळा पुढील प्रमाणे : ज्योत्स्ना बाळू पवारहुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा, कात्रज , मोनिका गणेश नेवासकर रँग्लर पु परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा, लक्ष्मी रोड, मधुरा पांडुरंग चौधरी सारथी प्राथमिक विद्यालय, खराडी , प्रिया गणेश इंदुलकर नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ, संजय आबासाहेब दरेकर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, ईऑन ग्यानांकूर स्कूल, खराडी.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान