पुणे, ७ अक्टूबर २०२४: राज्यात विधानसभा निवडणुकांचं वादळ काही दिवसांवर येऊन ठेपलय. काही दिवसांत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्षांनी आपापली गणित मांडायला सुरूवात केली आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामतीमधून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे असलेला पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. यासह हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती पाहता येथून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार १९९१ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून २०१९ पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील परिस्थिती बदलली आहे. याचबरोब अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीतून निवडणूक लढणार नसल्याचाही सूचक इशार दिला होता. अशात आता अजित पवार शिरूरमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सध्या शिरूर मतदार संघातील आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले होते. परंतू, अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आजही शरद पवार यांच्यासोबत कामय आहेत. आता जर अजित पवार यांनी शिरूरमधून विधानसभा निवडणूक लढवली तर बारामतीतून घड्याळ आणि तुतारीच्या चिन्हावर कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
More Stories
पुणे: पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत; तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पंतप्रधान आवास योजनेसाठी साडे चार हजार अर्ज