February 12, 2025

संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथील दक्षिण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी पदी अंकुश चव्हाण यांची नियुक्ती

पुणे, दिनांक22 जानेवारी 2025 : भारतीय माहिती सेवेतील अधिकारी अंकुश चव्हाण यांची संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथील दक्षिण विभागाच्या जनसंपर्कपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. अंकुश चव्हाण 2009 साली भारतीय माहिती सेवेत रुजू झाल्यानंतर नवी दिल्ली येथे गृह मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या तसेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड, रत्नागीरी,कोल्हापूर, सोलापूर व गोवा येथील केंद्रीय संचार ब्यूरो व दूरदर्शन मुंबई येथे विविध पदांवर जवळपास 15 वर्षे उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यापूर्वी श्री. चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील जलस्वराज्य प्रकल्पासाठी वर्धा आणि रत्नागिरी येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्य केले आहे, तसेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्य माध्यम सल्लागार पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. श्री.चव्हाण मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहीवासी असून त्यांनी पत्रकारितेमध्ये पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली आहे.