पुणे, ५ जुलै २०२६: अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), गेमिंग आणि AVGC-XR (Animation, Visual Effects, Gaming, Comics आणि Extended Reality) क्षेत्रातील कौशल्याधारित शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या Arena Animation ने आपल्या ३० वर्षांच्या प्रवासानिमित्त पुण्यात ग्रँड अल्युमनी मीट २०२६ चे आयोजन केले. प्राइड हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमात भारतासह युनायटेड किंग्डम, इटली, अमेरिका, कॅनडा आणि मलेशिया येथून आलेल्या जवळपास १०० माजी विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले. या निमित्ताने संस्थेच्या तीन दशकांच्या प्रवासाचा आढावा घेतानाच भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या AVGC-XR उद्योगातील नव्या संधींवरही चर्चा झाली.
यावेळी Arena Animation ने पुण्यात आपल्या १३व्या अल्युमनी चॅप्टरची घोषणा केली. यापूर्वी मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, नाशिक, इंदूर आणि वडोदरा येथे अल्युमनी नेटवर्क कार्यरत असून देशभरातील १,२०० हून अधिक माजी विद्यार्थी त्यामार्फत जोडले गेले आहेत. कार्यक्रमात Arena Originals या नव्या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना स्वतःची ओरिजिनल अॅनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटची बौद्धिक संपदा (IP) विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. गिरगिट स्टुडिओचे सहसंस्थापक अविनाश मेढे आणि अनुज कुमार तसेच Arena Animation चे वरिष्ठ उपाध्यक्ष व नॅशनल सेल्स हेड शाजन सॅम्युअल यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
Arena Animation एफ.सी. रोड सेंटरचे संचालक निखिल हळी यांनी सांगितले की, पुणे हे आज देशातील सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी केंद्रांपैकी एक बनले आहे. शिक्षण संस्था, आयटी कंपन्या, गेमिंग स्टुडिओ, स्टार्टअप्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स उद्योग यांचे मजबूत जाळे येथे तयार झाल्याने अॅनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, ग्राफिक्स आणि डिजिटल डिझाइन क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रात माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्राची मजबूत पायाभरणी असल्याने आगामी काळात AVGC-XR उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून विद्यार्थ्यांसाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.

ते पुढे म्हणाले की, या क्षेत्रातील करिअर आता केवळ चित्रपट आणि दूरचित्रवाणीपुरते मर्यादित राहिलेले नाही. गेमिंग, UI/UX डिझाइन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी, डिजिटल मार्केटिंग, आर्किटेक्चरल व्हिज्युअलायझेशन, ई-कॉमर्स, हेल्थकेअर सिम्युलेशन, ऑटोमोबाईल डिझाइन आणि डिजिटल कंटेंट निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये कुशल व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. बहुविध कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उद्योग दीर्घकालीन करिअरच्या दृष्टीने अत्यंत आशादायी ठरत आहे.
१९९६ मध्ये सुरू झालेल्या Arena Animation ने गेल्या तीन दशकांत हजारो कुशल व्यावसायिक घडविले आहेत. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी धुरंधर १ व २, द फॅमिली मॅन, कुरुक्षेत्र आणि मिर्झापूर यांसारख्या चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय गेमिंग प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक माजी विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये स्वतःचे स्टुडिओ आणि क्रिएटिव्ह कंपन्या स्थापन केल्या असून अनेकजण जागतिक कंपन्यांमध्ये AI, गेमिंग, ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रात वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून आगामी अकादमी पुरस्कारांच्या (ऑस्कर) व्हिज्युअल इफेक्ट्स विभागातील काही प्रकल्पांमध्येही त्यांच्या योगदानाची अपेक्षा असल्याची माहिती हळी यांनी दिली.
शाजन सॅम्युअल यांनी सांगितले की, भारतातील AVGC-XR उद्योग सध्या वेगाने विस्तारत असून कौशल्याधारित व्यावसायिकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील माजी विद्यार्थी देश-विदेशातील आघाडीच्या स्टुडिओमध्ये नेतृत्व करत असून अनेकांनी स्वतःचे उद्योगही उभारले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्यावर संस्थेचा भर कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात रोहित पन्हाळे, ओंकार वाखरे, दिव्या कटारिया, आर्यन भौमिक, आदित्य म्हस्के तसेच महाराष्ट्रातील सर्वात युवा ग्राफिक्स आणि मोशन ग्राफिक्स कलाकार म्हणून जागतिक विक्रम नोंदवलेले निखिल मुकुंद सरोदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उद्योगातील अनुभव, बदलते तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्रिएटिव्ह क्षेत्रातील व्यावसायिकांची उपस्थिती लाभली. नेटवर्किंग सत्र, भविष्यातील सहकार्यावरील चर्चा आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन