पुणे, ६ जुलै २०२६: राष्ट्रीय महामार्ग 965 डीडी राजेवाडी ते वरंधा, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट परिसरातील रस्त्यावर पावसाळयात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरडी कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ ऑगस्ट पर्यंत घाटरस्ता बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केले आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपुर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर-सातारा-कराड-कोल्हापूर किेवा राजेवाडी पाटा-पोलादपुर-खेड-चिपळून पाटण-कराड-कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबतचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन