July 27, 2024

पुण्यातील ब्यू बेल शाळेचा दहशतवादी प्रशिक्षणासाठी वापर, एनआयए पथकाकडून दोन मजले सील

पुणे, दि. १७/०४/२०२३: कोंढव्यातील अश्रफनगररोड  परिसरात असलेल्या  ब्यू बेल   शाळेत दहशतवादी कारवाया सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए)  माहिती  मिळताच पथकाने शाळेचे दोन्हीही मजले सील करीत  पोलिसांचा कडक पहारा ठेवला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही संघटना दहशतवादी कारावायांसाठी   प्रशिक्षण काही मुस्लीम तरूणांना देत असल्याचे  एनआयने नमूद केले आहे.

पीएफआयद्वारे दहशतवादी कारवायांच्या तयारीसाठी ब्ल्यू बेल शाळेतील मजल्यांचा वापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे. या ठिकाणी पीएफआय मुस्लीम तरूणांना भरती करत होते.   इस्लामीक राजवट स्थापन करण्यास विरोध करणार्‍यांना संपविण्यासाठी तरुणांना  शसस्त्र व निशस्त्र प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.  गेल्या वर्षी २२ सप्टेंबरला एनआयएने संबंधित शाळेतील   दोन मजल्यांची झडती घेतली होती.  जप्त केलेल्या  कागदपत्रांच्या आधारे  रविवारी दि. १६ एनआयएन् कारवाई केली. या कागदपत्रातूनच पीएफआय मुस्लीम तरूणांना शस्त्राचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले आहे. पीएफआय प्रमुख नेत्यांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करत होती. यात त्यांच्या विचारसरणीला विरोध करणार्‍या प्रमुख नेत्यांना टार्गेट करून त्यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा दावाही एनआएने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.