पुणे, दि. १७/०४/२०२३: नर्हे परिसरात भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरे तेल वाहतूक करणारा टँकर उलटल्यामुळे तेलाचे पाट वाहत होते. त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करीत आणि माती टाकून निसरडा झालेला मार्ग वाहतूकीसाठी पूर्ववत केला. सुदैवाने अपघातात जिवित हानी झालेली नाही.
तामिळनाडूमधील कोईमतूरमधून २४ हजार लिटर खोबरे तेल घेऊन टँकर मुंबईकडे निघाला होता. नर्हे येथील भूमकर पुलावर टँकर चालकाचे सुटल्याने टँकर उलटला. गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमधील तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला. सिंहगड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिसांसह वाहतूक विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करुन मार्ग स्वच्छ केला.
वाहतूकीचा वेग मंदावला
महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खोबरे तेल पसरल्याने मार्ग निसरडा झाला होता. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला होता. सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ पोलीस, वाहतूक पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य राबवल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान