पुणे, दि.25 मे 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र, ट्रिनिटी, आर्यन्स क्रिकेट अकादमी, ॲबिशियस, पीबीसीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी मैदानावरील सलामीच्या लढतीत आधार सावंत(40धावा व 2-24) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पीवायसी संघाचा 59 धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. पूना क्लब मैदानावरील लढतीत चेतन यादव(3-37) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने केडन्स संघाचा 30धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. डिझायर स्पोर्ट्स मैदानावरील सामन्यात अनिकेत कुडूक(2-43 व 32धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ट्रिनिटी संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लबवर 2 गडी राखून विजय मिळवला.
आर्यन्स क्रिकेट मैदानावरील सामन्यात आदर्श रावळ(55धावा व 1-40) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने पारसी जिमखाना संघाचा 63 धावांनी पराभव करत धडाकेबाज सुरुवात केली. बारणे क्रिकेट मैदानावरील लढतीत अर्जुन साळुंखे( 5-16) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ॲबिशियस संघाने स्टार्स क्रिकेट क्लबवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. व्हीव्हीसीए मैदानावरील सामन्यात अनिश जोशी(67 धावा व 3-36) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर पीबीसीए संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 92 धावांनी पराभव केला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दिपक गाडगीळ, सह सचिव सारंग लागू, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल छाजेड, संचालक रोहन छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव अविनाश रानडे, दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी, ऋजुता भालेकर, महेंद्र गोखले, निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
पूना क्लब मैदान:
पूना क्लब: 45 षटकात सर्वबाद 204 धावा(सिद्धांत बाफना 49(85,4×4), हर्षदीप सिंग 36, क्षितिज येडे 32, समर्थ भोरे 28, अनिकेत शिंदे 19, सुफियान सय्यद 3-50, मोहम्मद मुजावर 2-15) वि.वि.केडन्स: 43.2 षटकात सर्वबाद 174धावा(मोहम्मद मुजावर 54(58,3×4,2×6), संस्कार सोनवणे 34, धीरज ढेरे 19, अर्जुन माहुली 16, चेतन यादव 3-37, ऋग्वेद चौधरी 3-41, आर्यन हिंगणे 2-26); सामनावीर-चेतन यादव; पूना क्लब 30धावांनी विजयी;
डिझायर स्पोर्ट्स मैदान:
युनायटेड स्पोर्ट्स क्लब : 44.5 षटकात सर्वबाद 238धावा(भावेश माखिजा 67(83,10×4), अर्पण धार 58(58,9×4), साकेत श्याम 33, क्षितिज भालेराव 26, अद्वैत डेरे 2-22, अनिकेत कुडूक 2-43, रुद्र पाटील 2-28) पराभूत वि.ट्रिनिटी: 31.4 षटकात 8बाद 239धावा(वेदांत सुंताळे नाबाद 47(32,2×4,4×6), अमन सिंग 46(25,8×4,2×6), अनिकेत कुडूक 32, संग्राम कांबळे 34, अद्विक तिवारी 28, अंश टिल्लू 2-51); सामनावीर-अनिकेत कुडूक; ट्रिनिटी 2 गडी राखून विजयी;
पीवायसी मैदान:
क्लब ऑफ महाराष्ट्र : 44.2 षटकात सर्वबाद 276 धावा(सुमित कोकरे 48(31,7×4,2×6), सय्योग भोसले 58(60,4×4,3×6), आधार सावंत 40(40,4×4,1×6), हर्षवर्धन नरवटे 32,आराध्य सिंग 27, श्रीनिवास गाडे 23, यश अधिकारी 3-54, यथार्थ पडळकर 2-45, दक्ष पहाडे 2-47, रुहुल्ला नदाफ 2-52) वि.वि.पीवायसी: 45 षटकात 8बाद 217धावा(रुहुल्ला नदाफ 46(45,7×4), शिवम दिवेकर नाबाद 35, आर्यन लोंढे 30, यश अधिकारी 19, यश हाळे 2-30, श्रीनिवास गाडे 2-31, आधार सावंत 2-24);सामनावीर-आधार सावंत; क्लब ऑफ महाराष्ट्र 59 धावांनी विजयी;
आर्यन्स क्रिकेट मैदान:
आर्यन्स क्रिकेट अकादमी: 42.1 षटकात सर्वबाद 256धावा(आदर्श रावळ 55(30,5×4,4×6), शुभम गायकवाड 50(33,6×4,2×6), साई बोऱ्हाडे 46(52,6×4), विरांश वर्मा 31, गणेश बाड 44(46×4), शौर्य जाधव 4-30, सर्वेश वाघमारे 2-44)वि.वि.पारसी जिमखाना: 39.4 षटकात सर्वबाद 193 धावा (मोहम्मद वसीम 60(81,8×4,1×6), श्रवण गालफाडे 60(67,3×4,4×6), चैतन्य कोंडभर 16, शिवेने भारद्वाज 3-17, विराज मोरबळे 2-33, आदित्य दाडे 2-31, आदर्श रावळ 1-40); सामनावीर-आदर्श रावल; आर्यन्स 63 धावांनी विजयी;
बारणे क्रिकेट मैदान:
स्टार्स क्रिकेट क्लब: 25.2 षटकात सर्वबाद 79धावा(अनिश भोसले 23, श्लोक यने 10,अर्जुन साळुंखे 5-16, अनुराग सिंग 3-7, आदित्य कापरे 2-4) पराभुत वि.ॲबिशियस: 8.4षटकात बिनबाद 80धावा(आदित्य कापरे नाबाद 43(28,5×4,1×6), वेदांत हांचे नाबाद 27); सामनावीर – अर्जुन साळुंखे; ॲबिशियस 10 गडी राखून विजयी;
व्हीव्हीसीए मैदान:
पीबीसीए: 42.3 षटकात सर्वबाद 260धावा(अनिश जोशी 67(72,6×4,2×6), ऋग्वेद नाईक 42(38,5×4,1×6), ओम भामरे 39, इंद्रजीत शिंदे 17, वरद चत्तर 4-31, सुदर्शन तोरडमल 3-62, संतोष राठोड 2-67)वि.वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 36 षटकात सर्वबाद 168धावा(अथर्व काळे 72(71,10×4.2×6), वरद चत्तर 34, अभिषेक टोपनो 22, धनंजय झोरे 3-26, अनिश जोशी 3-36, समर्थ डोरनल 2-18); सामनावीर – अनिश जोशी; पीबीसीए 92 धावांनी विजयी.

More Stories
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 409 खेळाडू सहभागी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत संगम स्पोर्ट्स क्लब, सीएमएस फाल्कन्स संघांचे विजय
एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत सयान कुवड, देवहुती चव्हाण यांचे मानांकित खेळाडूंवर विजय