पिंपरी, २८ नोव्हेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यावरील हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत वाढवून आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मतदार यादीसंबंधित हरकती किंवा सूचना अ, ब, क, ड, इ, फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कक्षांमध्ये दाखल करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे; मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांकडे विचार केला जाणार नाही.
प्रारूप मतदार यादी प्रति पृष्ठ रु. २/- दराने सावित्रीबाई फुले स्मारक येथे विक्रीस उपलब्ध आहे.
राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम:
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध: ३ डिसेंबर २०२५
हरकती/सूचना स्वीकार: ५ ते १० डिसेंबर २०२५
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध: १० डिसेंबर २०२५
मतदान केंद्रांची यादी: १५ डिसेंबर २०२५
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी: २२ डिसेंबर २०२५
या निर्णयामुळे नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याची अधिक संधी मिळणार असून, निवडणुकीसंबंधी प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे.

More Stories
आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने नवी सांगवीतील ‘रोजगार मेळाव्यात’ १५४७८ पदांसाठी थेट मुलाखती
सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी विशेष पॉलिसी बनवणार- आमदार जगताप
तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप