May 20, 2024

दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना, व्हेरॉक, पूना क्लब संघांची विजयी सलामी

पुणे, 26 ऑक्टोबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन जिमखाना, पूना क्लब व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना मैदानावरील सामन्यात हर्ष संघवी(नाबाद 102धावा), अजय बोरुडे(नाबाद 72धावा) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पीबीकेजेसीए संघाचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीबीकेजेसीए संघ 48.2 षटकात सर्वबाद 262धावाच करू शकला. यात अभिषेक पवारने 108चेंडूत 14चौकार व 1षटकारासह 108 धावा ची शतकी खेळी केली. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने 48.3 षटकात 6बाद 266धावा करून पुर्ण केले. यात हर्ष संघवीने 82चेंडूत 11चौकार व 3. षटकाराच्या मदतीने नाबाद 102 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हर्षला अजय बोरुडेने 65चेंडूत 3चौकार व 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 72 धावा, साहिल कडने 32 धावा काढून साथ दिली.

डीव्हीसीए मैदानावरील सामन्यात टिळक जाधव(5-31) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 12 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात यश नाहर(नाबाद 206) याने केलेल्या धडाकेबाज द्विशतकी खेळीच्या जोरावर पूना क्लब संघाने अँबिशियस क्रिकेट क्लब संघाचा 134 धावांनी धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत गौरव कुमकर 3-26 व 19) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर 22 यार्ड्स संघाने रिक्रिएशन क्रिकेट क्लबचा 3 गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डीव्हीसीए मैदान:
डीव्हीसीए:30.1 षटकात सर्वबाद 127धावा(सौरभ नवले 39, यश जगदाळे 25, रोहित चौधरी 17, वैभव गोसावी 3-30, निकित धुमाळ 2-29, सय्यद आतिफ जमाल 2-6, नौशाद शेख 2-23)वि.वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 26.2 षटकात सर्वबाद 115धावा(यश क्षीरसागर नाबाद 23, आदिल अन्सारी 23, नौशाद शेख 19, टिळक जाधव 5-31, मनोज यादव 3-35);सामनावीर-टिळक जाधव; डीव्हीसीए संघ 12 धावांनी विजयी;

पूना क्लब मैदान:
पूना क्लब :50 षटकात 2बाद 408धावा(यश नाहर नाबाद 206(145,14×4,13×6), आकिब शेख 83(83,9×4,2×6), अजिंक्य नाईक नाबाद 66(38,6×4,4×6), अथर्व काळे 41, गौरव जोशी 1-84)वि.वि.अँबिशियस क्रिकेट क्लब: 50 षटकात 8बाद 274धावा(अभिनव भट्ट 57(48,7×4), ऋषिकेश बारणे 54(103,6×4), ऋषभ करवा 50(39,5×4,2×6), वैभव विभूते नाबाद 28, सागर बिरदवडे 2-34, हर्षल मिश्रा 2-46); सामनावीर-यश नाहर; पूना क्लब 134 धावांनी विजयी;

डेक्कन जिमखाना मैदान:
पीबीकेजेसीए: 48.2 षटकांत सर्वबाद 262धावा(अभिषेक पवार 108(108,14×4,1×6), तरनजीतसिंग डिलन 39, विशांत मोरे 20, मेहुल पटेल 15, आयुष काबरा 3-50, साहिल कड 2-32, धीरज पहत 2-32 59) वि.वि.डेक्कन जिमखाना:48.3 षटकात 6बाद 266धावा(हर्ष संघवी नाबाद 102(82,11×4,3×6), अजय बोरुडे नाबाद 72(65,3×4,5×6), साहिल कड 32, सोहम कुमठेकर 19, अक्षय दरेकर 2-50, हितेश वाळुंज 1-49); सामनावीर- अजय बोरुडे; डेक्कन जिमखाना 4 गडी राखून विजयी;

वीरांगण क्रिकेट अकादमी मैदान:
रिक्रिएशन क्रिकेट क्लब : 30.5 षटकात सर्वबाद 145धावा(हृषीकेश कुलकर्णी 31, सौरभ संकलेचा 29, रुद्रराज घोसाळे 22, मानस कोंढरे 21, गौरव कुमकर 3-26, सागर सिंग 2-31, नवनाथ गोरे वि. 2-126) पराभुत वि.22 यार्डस: 25 षटकात 7बाद 149धावा(श्रेयस केळकर 36(27,6×4), योगराज देशमुख 23, सोहम शिंदे 23, गौरव कुमकर 19, रौनक खंडेलवाल 4-38, रुद्रराज घोसाळे 2-33); सामनावीर-गौरव कुमकर; 22 यार्ड्स संघ 3 गडी राखून विजयी.