May 20, 2024

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंदिता उपाध्यायचा मानांकित खेळाडूवर खळबळजनक विजय

औंरंगाबाद, दि 26 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित आनंदिता उपाध्याय हिने हरियाणाच्या अव्वल मानांकित प्राची मलिकचा 6-2, 7-5 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
 
औंरंगाबाद येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरु असलेल्या एकेरीत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमने तामिळनाडूच्या सहाव्या मानांकित फजल अली मीरचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफुलेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या आराध्य म्हसदेचा 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकच्या चौथ्या मानांकित प्रकाश सरन याने गुजरातच्या आठव्या मानांकित ओम पटेलचा 6-2, 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या तविश पहवानेकर्नाटकच्या सातव्या मानांकित अनुराग कळंबेलाचा 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात  तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित सविता भुवनेश्वरनने कर्नाटकच्या कार्तिका पद्मकुमारचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने दिया अग्रवालचे आव्हान 7-5, 6-1 असे मोडीत काढले. दुसऱ्या मानांकित ओडिशाच्या आहानने नवव्या मानांकित अविपशा देहुरीचा टायब्रेकमध्ये 6-7(3), 6-2, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
दुहेरीत मुलांच्या गटात तेलंगणाच्या हृतिक कटकमने हरियाणाच्या तविश पाहवाच्या साथीत ईशान येडलापल्ली व नील केळकर यांचा 6-1, 6-3 असा तर, महाराष्ट्राच्या मनन अग्रवाल व गुजरातच्या ओम पटेल यांनी कुशाग्र अरोरा व नव्या यादव यांचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
हृतिक कटकम(तेलंगणा)(1)वि.वि.फजल अली मीर(तामिळनाडू)(6) 6-1, 6-2;
शिवतेज शिरफुले(महा)(3)वि.वि.आराध्या म्हसदे(महा)(11)6-3, 6-2;
प्रकाश सरन(कर्नाटक)(4) वि.वि.ओम पटेल(गुजरात)(8)6-2, 6-2;
तविश पहवा(हरियाणा)(2)वि.वि.अनुराग कळंबेला(कर्नाटक)(7) 6-3, 6-2;
 
मुली: 
आनंदिता उपाध्याय (महा)(5) वि.वि.प्राची मलिक(हरियाणा)(1)6-2, 7-5;
सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)(3)वि.वि.कार्तिका पद्मकुमार(कर्नाटक) 6-2, 6-3;
पार्थसारथी मुंढे (महा(7)वि.वि.दिया अग्रवाल 7-5, 6-1;
आहान(ओडिशा)(2)वि.वि.अविपशा देहुरी(9)6-7(3), 6-2, 6-3;
 

दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
हृतिक कटकम(तेलंगणा)/तविश पाहवा(हरियाणा)(1)वि.वि.ईशान येडलापल्ली(मध्यप्रदेश)/नील केळकर(महा) 6-1, 6-3;
मनन अग्रवाल(महा)/ओम पटेल(गुजरात)वि.वि.कुशाग्र अरोरा(दिल्ली)/नव्या यादव(दिल्ली) 6-3, 6-0;
दिगंथ एम(कर्नाटक)/अहान शेट्टी(महा)वि.वि.वरद पोळ(महा)/क्रिशांक जोशी(महा) 6-1, 6-3;
फजल अली मीर (तामिळनाडू)/प्रकाश सररान(कर्नाटक)(2)वि.वि.शिवा शर्मा(हरियाणा)/ऋषी यादव(उत्तरप्रदेश) 6-3, 6-2;

 

मुली:
आहान(ओडिशा)/पार्थसारथी मुंढे (महा)(1)वि.वि.नीशा इंजा(तेलंगणा)/श्रेया पठारे(महा) 6-0, 6-2;
सृष्टी किरण(कर्नाटक)/सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)वि.वि.सूर्यांशी शेखावत(राजस्थान)/इरा देशपांडे(महा) 7-6(1), 6-2;
दीया अग्रवाल/वृंदिका राजपूत(महा)वि.वि.सानिद्या कारंतोथ(तेलंगणा)/अविपशा देहुरी  7-5, 6-3;
आनंदिता उपाध्याय (महा)/रीत अरोरा(हरियाणा)(2)वि.वि.मधुमिता रमेश(तामिळनाडू)/आहिदा सिंग (कर्नाटक) 6-1, 6-4.