पुणे, 15 एप्रिल 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत जीओजी एफसी, परशुरामियन्स एससी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत जीओजी एफसी संघाने थंडरकॅट्झ एफसी संघाचा 5-0असा धुवा उडवला. जीओजी एफसी संघाकडून सतीश हवालदार(20,53मि.) याने दोन गोल, सुमित भंडारी(22मि.), सुमीत काटे(69मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात परशुरामियन्स एससी संघाने दिएगो ज्युनियर एफसीचा 5- 3 असा पराभव केला. विजयी संघाकडून गौरव स्वामीनाथन(6मि.), सॅमसन जोसेफ(30मि.), सॅम्युअल साल्वादास(32मि.), अथर्व कदम(51मि.), वेदांत देसाई(63मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर पराभूत संघाकडून परम राठोड(15मि.), चल्ला जॉन( 28मि.), ग्लेन रिबेलो(66 मि.) यांनी गोल केले.
अन्य लढतीत इंद्रायणी एससी संघाने चेतक एफसी संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. चुरशीच्या लढतीत सीएमएस फाल्कन्स संघाने स्निग्मय पुणे एफसी संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले.
निकाल: साखळी फेरी:
इंद्रायणी एससी: 2(जगत राज 2मि., शुभम पोटघन 14मि.) बरोबरी वि.चेतक एफसी: 2 (निखिल पडवळ 28, 56मि.);
जीओजी एफसी: 5 (सतीश हवालदार 20,53मि., सुमित भंडारी 22 मि., सुमीत काटे 69मि.)वि.वि.थंडरकॅट्झ एफसी: 0;
सीएमएस फाल्कन्स: 2 (ऋग्वेद येवले 4मि., अक्षय अय्यर 24मि.) बरोबरी वि.स्निग्मय पुणे एफसी: 2(प्रतिक पाटील 42मि., अबिन ऑगस्टिन 22मि.);
परशुरामियन्स एससी: 5(गौरव स्वामीनाथन 6 मि., सॅमसन जोसेफ 30मि., सॅम्युअल साल्वादास 32मि., अथर्व कदम 51मि., वेदांत देसाई 63मि.) वि.वि.दिएगो ज्युनियर एफसी: 3(परम राठोड 15मि., चल्ला जॉन 28मि., ग्लेन रिबेलो 66 मि.)

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए व डेक्कन जिमखानाच्या वतीने प्रतिष्ठीत बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात आयोजन
चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत गतविजेत्या एएसआर डॉल्फिन्स संघाला विजेतेपद