पुणे ,१९ जुलै २०२३: भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली.
पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदाची मुदत उलटून जवळपास एक वर्ष होऊन गेलेला आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण याची चर्चा शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. यामध्ये स्वतः जगदीश मुळीक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर काही जण इच्छुक होते.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये धीरज घाटे हे देखील इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केलेला होता. मात्र पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार करण्यात आलेला नव्हता. त्यांना पक्षाच्या नेत्यांकडून शहराध्यक्ष पदाचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येत होते. कसब्याच्या निवडणूकीनंतर संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील अशी संकेत पक्षाचे नेतृत्वाने दिलेले होते. पण राज्यात घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडींमुळे भाजपकडून शहराध्यक्ष पदाची घोषणा केली जात नव्हती.
धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत सध्या ते पुणे शहर प्रभारी व प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत होते
या निवडीनंतर घाटे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे पुणे शहरात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे राज्यात भा ज पा सेना राष्ट्रवादी चे असलेले मजबूत सरकार केंद्रात हिंदुस्थान चे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनत असताना ही जबाबदारी मिळालेली आहे पुणे शहरात भारतीय जनता पार्टी येत्या सर्व निवडणुका अत्यंत जोमाने जिंकून आणून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे या पदाचा वापर हा सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं पक्षसंघटना मजबूत बांधून ती एकसंध टिकवून ठेवणार असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले
More Stories
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत
औरंगजेबाची कबर हटवयन्याची विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी ः अनयथा राज्यव्यापी ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलनचा इशारा