November 7, 2024

पुणे: किरीट सोमय्याच्या अश्लील कृत्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीचा निषेध

पुणे, १८/०७/२०२३: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमय्याच्या पोस्टरच्या तोंडाला शेण लावून महिलांनी जोड्याने मारले तसेच पोस्टर पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. “असली विकृत घाण महाराष्ट्रातून बाहेर काढा”, अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी बोलताना शहर संघटीका सविताताई मते म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे.

नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी .

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोपळे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, मीनाक्षी हरिशंद्रे, नमिता चव्हाण, अमृत पठारे, सुलभा तळेकर, स्वाती ठकार, शितल जाधव, अनुपमा मांगडे ,विजया मोहिते, शिल्पा पवार ,वत्सला घुले ,अनिता जांभूळकर ,स्नेहल आल्हट, वासंती शिरसाट, आशुताई शिरसाट, भारती दामजी, पल्लवी नागपुरे, वैशाली दिघे, विमल परदेसी, लता गुंजाळ, प्रियांका जव्हेरी, स्मिता पवार, दिपा भंडारी, नीलू गड्डम, बेबी म्हेत्रे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .