April 30, 2026

पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स संघाला विजेतेपद

पुणे, 28 एप्रिल 2026: पुना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत श्रीनिवास चाफळकर 2-14 व नाबाद 42) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पँथर्स संघाने सेलर्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

पुना क्लब येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना सेलर्स संघाने 6षटकात 3बाद 86धावा केल्या. यात शिव किर्लोस्कर 48, रौनक ढोले पाटील 24 यांनी धावा केल्या. पँथर्स संघाकडून श्रीनिवास चाफळकर(2-14), अजिंक्य मेहता(1-11) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

हे आव्हान पँथर्स संघाने 5.4षटकात 2बाद 87धावा करून पूर्ण केले. यात श्रीनिवास चाफळकरने 13चेंडूत 3चौकार व 4षटकाराच्या नाबाद 42धावा, गौरव चाफळकरने नाबाद 23धावा, अजिंक्य मेहताने 11 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: अंतिम फेरी:
सेलर्स: 6षटकात 3बाद 86धावा(शिव किर्लोस्कर 48(19,1×4, 6×6), रौनक ढोले पाटील 24(10, 3×6), श्रीनिवास चाफळकर 2-14, अजिंक्य मेहता 1-11) पराभूत वि. पँथर्स: 5.4षटकात 2बाद 87धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 42(13,3×4,4×6), गौरव चाफळकर नाबाद 23(13, 2×4,1×6), अजिंक्य मेहता 11, वेद ओसवाल 1-13); सामनावीर – श्रीनिवास चाफळकर; पँथर्स 8 गडी राखून विजयी.