May 10, 2024

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत क्वालिफायर अर्जुन वेलुरीचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

औंरंगाबाद, दि 30 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्जुन वेलुरीने पाचव्या मानांकित वरद पोळचा 6-0, 2-6, 7-5 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात इशान खडीरने सिद्धेश खाडेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. चुरशीच्या लढतीत देवेंद्र कुलकर्णी याने व्यंकट नरेंद्र महांकालीचा 6-1, 5-7, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला.
शिवतेज शिरफुलेने अहान डे चे आव्हान 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले. फजल अली मीरने मुरली रत्नालाचा 6-3, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. चौथ्या मानांकित निवेद पोनपा कोनेराने जे ब्रायन मोसेसचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशुतोष मिश्रा, प्रविण प्रसाद, अभिनव मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे आणि एआयटीए सुपरवायझर सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुले: पहिली फेरी: मुख्य ड्रॉ:
इशान खडीर(भारत)वि.वि.सिद्धेश खाडे (भारत)6-1, 6-2;
देवेंद्र कुलकर्णी (भारत)वि.वि.व्यंकट नरेंद्र महांकाली(भारत) 6-1, 5-7, 6-4;
अर्जुन वेलुरी (भारत)वि.वि.वरद पोळ (भारत) [5]6-0, 2-6, 7-5;
प्रकाश सरन (भारत) [3]वि.वि.कृष्णा राणी (भारत)6-1, 6-1;
शिवतेज शिरफुले (भारत) वि.वि.अहान डे (भारत)6-1, 6-0;
फजल अली मीर (भारत)वि.वि.मुरली रत्नाला (भारत) 6-3, 6-4;
दक्ष मुदुनुरी(भारत) [7]वि.वि.विहान जैन(भारत) 6-1, 6-3;
शशांक साईप्रसाद कर्नाटकी(भारत) [8]वि.वि.मलय केयुरभाई मिंजरोला (भारत)6-2, 7-5;
आदित्य आचार्य (भारत) वि.वि.आरव अरविंद (भारत)6-0, 6-1;
निवेद पोनपा कोनेरा (भारत) [4]वि.वि.जे ब्रायन मोसेस (भारत) 6-0, 6-0;
क्रिशांक जोशी (भारत) वि.वि.नील आंबेकर (भारत)6-0, 6-1.