May 9, 2024

पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत सहारा क्रिकेट अकादमी, सनराईज क्रिकेट स्कुल संघांचा पहिला विजय

पुणे, 30 ऑक्टोबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत सहारा क्रिकेट अकादमी, सनराईज क्रिकेट स्कुल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून पहिला विजय मिळवला.
सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी  प्रथमेश नागपुरे(4-17) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सनराईज  क्रिकेट स्कूल संघाने पीबीकेजेसीए संघाचा 8 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जयंत वडघुले(70धावा व 1-1)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर  पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमीचा 138 धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली.
अन्य लढतीत संस्कार ढवळेच्या उपयुक्त नाबाद 56धावांच्या खेळीच्या जोरावर सहारा क्रिकेट अकादमी संघाने बीअ स्पोर्टस संघाचा 6 गडी राखून पराभव केला.
सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीबीकेजेसीए: 40.2 षटकात सर्वबाद 125धावा(वेदांत पाटेकर 22, यश कुंटे 28, प्रथमेश नागपुरे 4-17, अर्णव डोबळे 2-21) पराभुत वि.वि.सनराईज  क्रिकेट स्कूल: 21.2 षटकात 2बाद 126धावा(ओम पवार नाबाद 32 6×4), रुद्र जोजर 50(56,8×4), ऋतुराज मुरकुटे 19, ध्रुव पराडकर 1-33)सामनावीर- प्रथमेश नागपुरे; सनराईज क्रिकेट स्कूल संघ 8 गडी राखून विजय;
पीवायसी हिंदू जिमखाना: 42.1 षटकात सर्वबाद 280धावा(जयंत वडघुले 70(75,8×4), ओंकार साळुंके 77(72,9×4,2×6), ईशान गुप्ते 30, अनुराग सिंग 3-41)वि.वि.पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी: 44.5 षटकांत सर्वबाद 142धावा(अनुराग सिंग 58(39,7×4,3×6), सर्वेश चांदेकर २८, दर्शिल वाघेला 3-24, जयंत वडघुले 1-1);सामनावीर-जयंत वडघुले; पीवायसी संघ 138 धावांनी विजयी;
बीअ स्पोर्टस: 45 षटकात 6बाद 168धावा(सर्वा सिंग नाबाद 80(125,12×4), सिद्धांत लाडे 22, ओजस शेंद्रे 3-20) पराभुत वि.सहारा क्रिकेट अकादमी: 31.4 षटकात 4बाद 169धावा(संस्कार ढवळे नाबाद 56(51) 4×4,4×6), राजवीर बनसोडे 37(33,4×4,1×6), आदित्य तुळजापूरकर नाबाद 22, ओजस शेंद्रे 13, वेदांत जाधव 3-41);सामनावीर-संस्कार ढवळे; सहारा क्रिकेट अकादमी संघ 6 गडी राखून विजयी;