पुणे, दि.9 एप्रिल, 2026 – एबीए कप यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पुसाळकर फाउंडेशन पुरस्कृत पुणे पिकलबॉल साखळी स्पर्धेत साखळी फेरीत फाल्कन फुरी, स्मॅशिंग शार्क, टस्कर टायटन्स, गोल्डन ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
डिंक पिकलबॉल एरिना, हिंजेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत यश गायकवाड, निपुण खुराना, शिशिर लंके, रोहन देशमुख, संकेत जैन, आदित पलरेशा, साहिल मदन, महिमा भारस्वडे, श्रेयस रानडे, आदित पलरेशा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर फाल्कन फुरी संघाने रॉयल टायगर्स संघाचा 6-2 असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत टस्कर टायटन्स संघाने एस ॲलिगेटर्स संघाचा 5.5-2.5 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून ऋतुराज देशपांडे, पार्थ शेवाळे, वरुण मित्तल, कार्तिक शेवाळे, ऋषभ गुप्ता, लवित दोशी मल्हार निगडे, सुजाता गुप्ता, आलोक देशपांडे यांनी सुरेख कामगिरी बजावली.
अन्य लढतीत स्मॅशिंग शार्क संघाने ब्लेझिंग चिताज संघाचा 4.5-3.5 असा तर, गोल्डन ईगल्स संघाने वाइल्ड वुल्व्हस संघाचा 4.5-3.5 असा पराभव करून विजयी सुरुवात केली.
निकाल:
फाल्कन फुरी वि.वि.रॉयल टायगर्स 6-2(आशना पेडणेकर/शिशिर लंके पराभुत वि.करण थिराणी/रोहन देवधर 06-11; यश गायकवाड/निपुण खुराना वि.वि.अथर्व खिस्ती/आकाश मेनन 11-00; शिशिर लंके/रोहन देशमुख वि.वि.जोएल/रोनित जोशी 11-05; संकेत जैन/आदित पलरेशा वि.वि. रोहन पुसाळकर/जोएल 11-01; साहिल मदन/महिमा भारस्वडे वि.वि.सारंग वाघ/नितीन राजहंस 11-09; श्रेयस रानडे/आदित पलरेशा वि.वि.सई अनगळ/मुस्कान जगवाणी 11-00;
स्मॅशिंग शार्क वि.वि.ब्लेझिंग चिताज 4.5-3.5(रमित देसाई/अर्जुन राऊत पराभुत वि.कुलदीप रुचंदानी/राज कपूर 01-11; आद्या पारसनीस/रमित देसाई वि.वि.अजय चौधरी/मंदार भिडे 11-10; अर्जुन राऊत/विशाल सेठ वि.वि.अतुल जोशी/हिमांशू कपाटिया 11-08; हेरब आगा/राकेश फणसे वि.वि.अमितोज सेठी/चैतन्य 11-07; आशुतोष देशपांडे/सोनल शिरसाट पराभुत वि.अमितोज सेठी/आरती पांडे 03-11; धनश्री उत्तुरकर/मोनिका शास्त्री पराभुत वि.प्रियेश कोकजे/शुनिला कपूर 01-11);
टस्कर टायटन्स वि.वि.एस ॲलिगेटर्स 5.5-2.5(ऋतुराज देशपांडे/पार्थ शेवाळे वि.वि.विविन राणा/लोहित गेलानी 02-11; वरुण मित्तल/कार्तिक शेवाळे वि.वि. प्रशांत बोरा/पियुष गायकवाड 11-04; ऋषभ गुप्ता/लवित दोशी वि.वि.प्रशांत बोरा/श्रावणी देशमुख 11-09; मल्हार निगडे/लवित दोशी वि.वि.कैवन गांधी/निखिल कानडे 11-05; सुजाता गुप्ता/आलोक देशपांडे वि.वि.प्रवीण त्रिकन्नड/सौरभ देशपांडे 11-05; साक्षी दासवानी/शिवम श्रॉफ पराभुत वि.किया शहाणी/अखिलेश घाटगे 06-11);
गोल्डन ईगल्स वि.वि.वाइल्ड वुल्व्हस 4.5-3.5 (यश सुलतानिया/अर्पण चौधरी वि.वि.अनुज भावे/पार्थ सुर्यवंशी 11-07; आरुष लेखा/संकेत राजोपाध्ये पराभुत वि.साहिल गुजराथी/अभिषेक विशाल 05-11; अर्जुन कुमार/सलील गुप्ता वि.वि.गिरीश कांदिवल/होजैफा हकीम 11-03; शार्दुल राव/तुषार तेंडुलकर पराभुत वि.शिवा किरण/होजैफा हकीम 06-11; तुषार तेंडुलकर/मयूर कुलकर्णी पराभुत वि.संजना/गौतम कंटक 06-11; साक्षी सिन्हा/देवेश गर्ग पराभुत वि.वृषाली पांडे/सचिन 03-11)

More Stories
चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत पहिल्या दिवशी एसके फ्लिपर्स, एएसआर डॉल्फिन्स संघांची धडाकेबाज कामगिरी
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत सेंट मेरीज, महाराष्ट्र मंडळ, विद्यांचल, दस्तुर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ, राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी, नहाटा संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश