पुणे, 6 एप्रिल 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत फातिमा इलेव्हन, यूकेएम कोथरूड एफसी, आयफा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या लढतीत मोहम्मद जहांगीरदार(2मि), मोहम्मद सय्यद(43मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर फातिमा इलेव्हन संघाने रिअल पुणे युनायटेड एफसी संघाचा 2-0 असा पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात यूकेएम कोथरूड एफसी संघाने परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब संघावर 4-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाकडून शौर्यजीत राठोड(3,29मि.) याने दोन गोल तर, शुभम भोसले(45मि.), मोहम्मद आतिफ(55मि.) याने एके गोल केला. अन्य लढतीत आयफा संघाने न्यू इंडियन सॉकर क्लब संघाचा 5-0 असा धुव्वा उडवला. आयफा संघाकडून रियान यादगिरी(7,67मि.)ने दोन गोल , याह्या शेख(22मि.),अबुबकर मणियार(55मि.), शाहिद खान(62मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल: साखळी फेरी:
फातिमा इलेव्हन: 2 (मोहम्मद जहांगीरदार 2मि., मोहम्मद सय्यद 43 मि.) वि.वि.रिअल पुणे युनायटेड एफसी: 0;
यूकेएम कोथरूड एफसी: 4 (शौर्यजीत राठोड 3,29 मि., शुभम भोसले 45 मि., मोहम्मद आतिफ 55 मि.) वि.वि.परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब: 0;
आयफा: 5(रियान यादगिरी 7,67मि., याह्या शेख 22मि., अबुबकर मणियार 55मि., शाहिद खान 62मि.)वि.वि.न्यू इंडियन सॉकर क्लब: 0.

More Stories
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देव रुपारेलिया, लक्ष्या राजेश यांना अग्रमानांकन