पुणे, २७ एप्रिल २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी थेट सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत गप्प का? साधा निषेधही नोंदवला नाही, ही लाजिरवाणी बाब आहे,” असे त्यांनी ठणकावले.
शिंदे पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांनी देशाला दिशा दिली. तरीही अशा भोंदूबाबाकडून अपमानास्पद वक्तव्य होत असताना सत्ताधारी मौन बाळगतात, हे गंभीर आहे. भाजपा-आरएसएसकडून सातत्याने महाराजांची बदनामी व इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.”
या प्रकरणात संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेसने इशारा दिला की, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल.
या आंदोलनात अरविंद शिंदे यांच्यासह स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, यशराज पारखी, नगरसेविका दिपाली डोख, अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, संगीता पवार, प्राची दुधाणे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, ऋग्वेदिता सपकाळ, मोहसीन शेख, ॲन्थोनी जेकब, मिलिंद पोकळे, रविंद्र माझिरे, संदिप मोकाटे, मारुती माने, रवि आरडे, चेतन आगरवाल, फिरोज शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, संतोष सुपेकर, चेतन पडवळ, अनिल धिमधिमे, वैभव डांगमाळी, ऋषीकेश बालगुडे, वीरेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

More Stories
Pune: पथारी व्यावसायिकांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव
Pune: टॅंकर भरले ५०; नोंद फक्त १८; पटवर्धन बागेतील भरणा केंद्रात मोठा घोळ
Pune: नदीकाठ प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश