पुणे, 26 एप्रिल 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 32 व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 60 व 70 वर्षांवरील पुरुष सांघिक गटात महाराष्ट्र संघाने, तर, 65 वर्षांवरील महिला सांघिक गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद संपादन केले. तर, एकेरीत महाराष्ट्राच्या वीणा जोशी, राजेश्वरी मेहेत्रे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत 60 वर्षांवरील पुरुष सांघिक गटात अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने तामिळनाडू संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून अजय कोठावळे, पराग जुवेकर, अतुल देशमुख यांनी सुरेख खेळी केली. 65 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम सामन्यात अनिल कुमार गोयल, रवी वशिष्ठ , नरेंदर सिंग रावत यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर
दिल्ली संघाने महाराष्ट्र अ संघाचा 3-0 असा सहज पराभव विजेतेपदाचा मान पटकावला.
65 वर्षांवरील महिला सांघिक गटात अंतिम फेरीत राजेश्वरी मेहेत्रे, रंजना पत्की यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 70 वर्षांवरील पुरुष सांघिक गटात अंतिम फेरीत योगेश देसाई, शिवानंद कुंडजे, जितेंद्र मेहता, पर्सी मेहता यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर
महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एकेरीत 70 ते 80 वर्षांवरील महिला गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या वीणा जोशी हिने राजस्थानच्या बाकलीवाल जैनचा 3-0(11-06, 11-08, 11-06) असा सहज पराभव करून विजेतपदाला गवसणी घातली.65 वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या राजेश्वरी मेहेत्रे हिने मध्यप्रदेशच्या रिता जैनचा 3-1(10-12, 11-07, 11-09, 11-06 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 60 वर्षांवरील महिला एकेरीत बंगालच्या मंटू मुरूमु हिने मध्यप्रदेशच्या रुबी कौरचा 3-2(11-09, 09-11, 13-11, 13-15, 11-07) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस, पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, श्रुती जोशी, स्पर्धा संयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश तुळपुळे, श्रीराम कोनकर, स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: सांघिक गट:
60 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
तामिळनाडू वि.वि.गुजरात 3-0(एकेरी: डी सुरेंद्रनाथ वि.वि.पराग शहा 08-11, 12-10, 10-12, 11-05, 11-06; एकेरी: व्ही कल्याणरामण वि.वि.लक्ष्मणराव ठाकरे 09-11, 11-06, 11-08, 11-09; एकेरी: एस स्वामीनाथन वि.वि.संजय तयाल 06-11, 11-09, 04-11, 12-10, 11-09);
महाराष्ट्र वि.वि.महाराष्ट्र ब 3-2(एकेरी: अजय कोठावळे समीर हळदुळे 11-07, 11-06, 11-03; एकेरी: पराग जुवेकर वि.वि.अशोक कळंबे 13-11, 13-11, 12-10; एकेरी: पुरषोत्तम मरकड पराभूत वि. नितीश कुमार धाकप्पा 08-11, 09-11, 11-04, 09-11; एकेरी: पराग जुवेकर पराभूत वि. समीर हळदुळे 08-11, 08-11, 11-06, 11-08, 06-11; एकेरी: अजय कोठावळे वि.वि.अशोक कळंबे 11-04, 11-04, 11-07);
अंतिम फेरी:
महाराष्ट्र वि.वि.तामिळनाडू 3-0(एकेरी: अजय कोठावळे वि.वि.डी सुरेंद्रनाथ 11-05, 11-06, 11-08; एकेरी: पराग जुवेकर वि.वि.व्हि कल्याणरमण 11-07, 11-09, 05-11, 11-05; एकेरी: अतुल देशमुख वि.वि.एस स्वामीनाथन 11-05, 11-07, 13-11);
65 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
दिल्ली वि.वि.कर्नाटक 3-0(एकेरी: रवी वशिष्ठ वि.वि.चंद्रशेखर नुई 11-07, 11-09, 11-03; एकेरी: अनिल कुमार गोयल वि.वि.मारुतराव गरुड 12-10, 09-11, 11-09, 09-11, 11-07; एकेरी: नरेंदर सिंग रावत वि.वि.वामक खडपे 11-08, 11-08, 11-08);
महाराष्ट्र अ वि.वि.महाराष्ट्र 3-0(एकेरी: अनिल निंबाळकर
वि.वि.उमेश कुंभोजकर 08-11, 11-05, 11-07, 11-09; एकेरी: हरीश साळवी वि.वि.जयंत कुलकर्णी 15-17, 11-08, 12-10, 11-06; एकेरी: रवींद्र देवधर वि.वि.अविनाश जोशी 11-07, 11-09, 11-08);
अंतिम फेरी:
दिल्ली वि.वि.महाराष्ट्र अ 3-0(एकेरी: अनिल कुमार गोयल वि.वि.अनिल निंबाळकर 08-11, 12-10, 11-06, 11-07; एकेरी: रवी वशिष्ठ वि.वि.हरीश साळवी 11-08, 10-12, 11-05, 11-09; एकेरी: नरेंदर सिंग रावत वि.वि.रवींद्र देवधर 14-12, 12-10, 14-12);
65 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
महाराष्ट्र वि.वि.महाराष्ट्र अ 3-0(एकेरी: रंजना पत्की वि.वि.उज्वला सुतार 11-06, 11-05, 11-00; एकेरी: राजेश्वरी मेहेत्रे वि.वि.ज्योती कुलकर्णी 11-06, 11-06, 11-08; दुहेरी: राजेश्वरी मेहेत्रे/रंजना पत्की 12-10, 11-05, 11-06);
दिल्ली वि.वि.मध्यप्रदेश 3-1(एकेरी: रोहिणी मराठे वि.वि.अल्का कंजोलिया 11-04, 11-05, 11-04; एकेरी: इंदू शर्मा पराभूत वि.रीता जैन 07-11, 04-11, 09-11; दुहेरी: रोहिणी मराठे/इंदू शर्मा वि.वि.रीता जैन/अल्का कंजोलिया 12-10, 12-10, 11-07; एकेरी: इंदू शर्मा वि.वि.अल्का कंजोलिया 11-07, 11-03, 11-02);
अंतिम फेरी:
महाराष्ट्र वि.वि.दिल्ली 3-0(एकेरी: राजेश्वरी मेहेत्रे वि.वि.रोहिणी मराठे 11-04, 11-07, 11-09; एकेरी: रंजना पत्की वि.वि.इंदू शर्मा 11-09, 07-11, 08-11, 11-09, 11-07; दुहेरी: राजेश्वरी मेहेत्रे/रंजना पत्की वि.वि.रोहिणी मराठे/इंदू शर्मा 11-03, 12-10, 11-06);
70 वर्षांवरील पुरुष गट: अंतिम फेरी:
महाराष्ट्र वि.वि.दिल्ली 3-0(एकेरी: योगेश देसाई वि.वि.एमव्हि अगरवाल 11-07, 11-07, 11-06; एकेरी: शिवानंद कुंडजे वि.वि.आरएन मसालदनी 11-04, 11-06, 11-02; दुहेरी: जितेंद्र मेहता/पर्सी मेहता वि.वि.एम चौधरी सिंग/सुरेश कुमार 11-06, 11-07, 11-08;
एकेरी गट: 60 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
मंटू मुरूमु(बंगाल) वि.वि.मनिषा कटारिया(मध्यप्रदेश)3-1(11-06, 11-09, 08-11, 12-10);
रुबी कौर(मध्यप्रदेश)वि.वि.रश्मी सोनी(मध्यप्रदेश)3-0(11-09, 12-10, 11-08);
अंतिम फेरी: मंटू मुरूमु(बंगाल) वि.वि.रुबी कौर(मध्यप्रदेश)3-2(11-09, 09-11, 13-11, 13-15, 11-07);
65 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
रिता जैन(मध्यप्रदेश) वि.वि.इंदू शर्मा(दिल्ली)3-1(07-11, 11-07, 11-06, 11-09);
राजेश्वरी मेहेत्रे(महाराष्ट्र) वि.वि.रोहिणी मराठे(दिल्ली)11-05, 11-08, 11-03);
अंतिम फेरी: राजेश्वरी मेहेत्रे(महाराष्ट्र) वि.वि.रिता जैन(मध्यप्रदेश) 3-1(10-12, 11-07, 11-09, 11-06);
70 ते 80 वर्षांवरील महिला: अंतिम फेरी:
वीणा जोशी(महाराष्ट्र) वि.वि.बाकलीवाल जैन(राजस्थान) 3-0(11-06, 11-08, 11-06).

More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स व सेलर्स यांच्यात अंतिम लढत
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स, टिप्सि टायटन्स, सेलर्स, जेट्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
ब्राह्मण युनिटी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘बीबीएल ३’ (BBL 3) बॅडमिंटन स्पर्धेचा पुण्यात शानदार समारोप