पुणे, 26 एप्रिल 2026: पुना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत पँथर्स, सेलर्स या संघांनी अनुक्रमे जेट्स, टिप्सि टायटन्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या लढतीत शिव किर्लोस्कर नाबाद 68 धावांच्या खेळीच्या जोरावर सेलर्स संघाने टिप्सि टायटन्स संघाचा 21 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात श्रीनिवास चाफळकरच्या 38 धावांच्या जोरावर पँथर्स संघाने जेट्स संघाचा 4धावांनी पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
निकाल: उपांत्य फेरी:
सेलर्स: 6षटकात 3बाद 93धावा(शिव किर्लोस्कर नाबाद 68(21,3×4,8×6), रौनक ढोले पाटील 14, अमेय श्रीखंडे 1-6) वि.वि. टिप्सि टायटन्स: 6षटकात 6बाद 72धावा(प्रसाद जाधव 22, अमेय सोमण 22, अंकुश जाधव 13, नीरव शहा 2-7, पवन कटारिया 1-5); सामनावीर – शिव किर्लोस्कर; सेलर्स 21 धावांनी विजयी;
पँथर्स: 6षटकात 3बाद 93धावा(श्रीनिवास चाफळकर 38(12, 3×4,4×6), अर्जुन कीर्तने 22, कर्णा मेहता 22, पुनीत सामंत1-7)वि.वि. जेट्स: 6षटकात 5बाद 89धावा(पुनीत सामंत 36(12, 5×6), चिराग लुल्ला 22, धर्मवीरसिंह जडेजा 14, रोहित बर्वे 1-12); सामनावीर श्रीनिवास चाफळकर; पँथर्स 4धावांनी विजयी.

More Stories
32व्या वरिष्ठ राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 60 व 70 वर्षांवरील पुरुष गटात महाराष्ट्र संघाला विजेतेपद
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स, टिप्सि टायटन्स, सेलर्स, जेट्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
ब्राह्मण युनिटी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘बीबीएल ३’ (BBL 3) बॅडमिंटन स्पर्धेचा पुण्यात शानदार समारोप